शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

आम्ही शहीद कुटुंबीय नाही का?

By admin | Updated: September 13, 2016 04:57 IST

कर्तव्य बजावताना जीव पणाला लावणारे पोलीस नाईक अजय गावंड आणि वाहतूक पोलीस हवालदार विलास शिंदे यांना २००९ च्या शासन निर्णयानुसार सोमवारी मदत जाहीर करण्यात आली.

मनीषा म्हात्रे,  मुंबईकर्तव्य बजावताना जीव पणाला लावणारे पोलीस नाईक अजय गावंड आणि वाहतूक पोलीस हवालदार विलास शिंदे यांना २००९ च्या शासन निर्णयानुसार सोमवारी मदत जाहीर करण्यात आली. यात धक्कादायक बाब म्हणजे या दोघांचीच नावे पोलीस दफ्तरी असल्याने पोलीस दलात नाराजी पसरली आहे. अशाच प्रकारे २०१२ मध्ये धाडसी कामगिरी करत मृत्यू पावलेल्या दत्ता सरनोबत कुटूंबियांनी आम्ही शहीद कुटुंबीय नाही का? अशी व्यथा ’लोकमत’कडे मांडली. मुंबई पोलीस दलात कार्यरत असताना अजय गावंड यांच्यासह नितीन परब, दत्तू अप्पा सरनोबत यांच्यासारख्या काही पोलिसांनी कर्तव्य बजावताना प्राण गमावले. अशा शहीद पोलिसांना आर्थिक भरपाई देण्याचे २००९ च्या शासन निर्णयात नमूद आहे. त्यात २०१४ मध्ये शहीद कृतज्ञता निधीची भर पडली. यातून १० लाख रुपयांची मदत शहीद कुटुंबियांना दिली जाते. यापैकी ही मदत नितीन परब यांना मिळाली. मात्र असे प्रसंग घडल्यानंतर त्यांच्या फाईली चाळल्या जातात. त्यांना कर्तव्य नोकरी, २५ लाख मदतीच्या घोषणा केल्या जातात. मात्र प्रत्यक्षात तुटपुंजी मदत करत त्यांची बोळवण केली जाते. वाहतूक पोलीस विलास शिंदे यांच्या निधनानंतर शासनाला गावंड यांची जाग आली. त्यांनी दिड वर्षानंतर गावंड यांच्या कुटुंबियांना ही मदत जाहीर केली. गावंड, शिंदे, परब यांच्यासारखेच दत्तू सरनोबत यांचा पुन्हा एकदा पोलीस दलाला विसर पडलेला दिसून आला. एसआरपीएफ मध्ये १२ वर्षानंतर सेवा बजावल्यानंतर वयाच्या ५२ व्या वर्षी खेरवाडी पोलीस ठाण्यात ते पोलीस उपनिरीक्षक पदी कार्यरत होते. सप्टेंबर २०१२ मध्ये पोलिसावर हल्ला करून गाडी पळवून नेणाऱ्या दोघा चोरटयांना पकडताना त्यांच्यावर हल्ला झाला. याच हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सरनोबत यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या कारवाई दरम्यान आरोपींकडून १६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. मात्र एवढी मोठी कामगिरी करुन प्रशासन मात्र अनभिज्ञच आहे. त्यांच्या निधनाला चार वर्षे उलटून गेली. आर्थिक मदत तर दुरच साधे पदक देखील त्यांना मिळाले नाही. पत्नी आणि दोन मुलांसोबत ते अंधेरीतील पोलीस लाईन येथे राहायचे. त्यांच्या मृत्यूनंतर वडीलांना शौर्य पदत मिळावे म्हणून त्यांचा मुलगा विकास आणि पत्नी कविता या सतत शासन दरबारी पायपीट करत आहेत. गावंड आणि शिंदे यांच्या यादीत सरनोबत यांचेही नाव नोंदविण्यात येणारअसल्याचे आश्वासन त्यांना देण्यात आले. मात्र शहीद कुटुंबियांना जाहीर केलेल्या मदत यादीत त्यांचे नावच नसल्याने या कुटुंबियांचा लढा पुन्हा सुरुच राहीला. पतीने संपूर्ण आयुष्य पोलीस दलात अपर्ण केले. तरी देखील त्यांच्या हक्कासाठी झगडण्याची वेळ येणे ही फार दुर्दैवी बाब असल्याचे सरनोबत यांच्या पत्नी कविता यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. दोन्ही कुटुंबियांना आर्थिक भरपाईगावंड आणि शिंदे यांच्या दोन्ही कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक नुकसान भरपाई, सेवानिवृत्तीच्या दिनाकांपर्यंत वेतन, महागाई भत्ता, वेतन आयोगानुसार सुधारित वेतन, निवासस्थान रिक्त केल्यानंतर सेवानिवृत्तीच्या दिनाकांपर्यंत घरभाडे भत्ता, सानुग्रह अनुदान म्हणून १.५ लाख अथवा अंतिम वेतनाच्या २० पट सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे.काय नाव त्यांचे : सरनोबत यांच्या नावाबाबत कुठलीही माहिती आपल्याकडे नाही. फक्त दोनच नावे आली होती. त्यांना २००९ च्या शासन निर्णयानुसार मदत जाहीर करण्यात आली आहे. सरनोबतबाबत अधिक माहिती घेऊन सांगतो, असे प्रशासन विभागाचे अनुप कुमार सिंह म्हणाले.पोलिसांचा निधी गेला कुठे ?मुंबईत जवळपास ४५ हजार पोलिसांचा फौजफाटा आहे. अशात गावंड यांच्या मत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांना पोलिसांचा एक दिवसाचा वेतन देण्याचे जाहीर केले. अशात दलातील एका दिवसाचे वेतन आले की ही रक्कम कोटींच्या घरात जाते. अशात त्यांच्या कुटुंबियांना अवघे १० लाख रुपये देण्यात येत असल्याने बाकीचा निधी गेला कुठे ? असा सवाल येथे उपस्थित होत आहे.