शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

आर्ची अद्यापही शाळेकडे फिरकली नाही

By admin | Updated: June 21, 2016 20:28 IST

लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या सैराट चित्रपटातील अभिनेत्री आर्ची उर्फ रिंकू राजगुरू यंदा दहावीत गेली तरी अद्याप शाळेकडे फिरकली नाही़

ऑनलाइन लोकमत,सोलापूर, दि. 21 -  लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या सैराट चित्रपटातील अभिनेत्री आर्ची उर्फ रिंकू राजगुरू यंदा दहावीत गेली तरी अद्याप शाळेकडे फिरकली नाही़. सध्या राज्यातील तमाम युवकांच्या गळ्यातील ताईत बनलेली सैराटमधील आर्ची अर्थात रिंकू राजगुरु शाळा सुरू होऊन आठवडा उलटून गेला तरी शाळेत हजर झाली नसल्याने नेटीझन्सकडून विविध प्रतिक्रीया व्यक्त होत आहेत. मात्र रिंकू अद्याप शाळेत गैरहजर असली तरी शाळेकडून कोणतीही कारवाई केली नाही, अशी माहिती रिंकू शिकत असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापिका मंजुषा जैन यांनी लोकमतला सांगितले. ती यंदा इयत्ता ९ वीतून १० वीत गेली आहे.

नवीन शैक्षणिक वर्ष आरंभ होऊन आज सप्ताह उलटला तरी इयत्ता १० वीत शिक्षण घेणारी सैराटची नायिका रिंकू राजगुरु शाळेत गैरहजर राहिली असून तिच्या बाबतीत सर्वसामान्य विद्यार्थी सातत्याने अनुपस्थित राहिल्यास शासनाचे जे नियम लागू आहेत. त्याच नियमानुसार तीन महिन्यांत रिंकूला उपस्थित राहण्याची वाट पाहून नंतर तीचे शाळेतील पटावरील नाव कमी करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.सैराटमुळे रिंकू राजगुरू प्रसिद्धीच्या झोतात आली. त्यामुळे तिचा वेगळा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. तिला पाहण्यासाठी व भेटण्यासाठी तरुणाई धडपडत असुन अकलूज येथे जिजामाता कन्या प्रशालेत शिकणा-या रिंकू राजगुरुचे दर्शन घडावे म्हणून शाळेच्या आरंभास प्रसिद्धी माध्यमांसह तरुणाई शाळा परीसरात उपस्थित होते. परंतु रिंकू शाळेला गैरहजर राहिल्याने सर्वांची निराशा झाली.