शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

पाटबंधारेच्या मुजोर कर्मचाऱ्यांना चाप

By admin | Updated: March 4, 2017 03:42 IST

लघुपाटबंधारे विभागात वर्षानुवर्षे एकाच टेबलवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे.

ठाणे : लघुपाटबंधारे विभागात वर्षानुवर्षे एकाच टेबलवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे. यामुळे वरिष्ठांचे आदेश धाब्यावर बसवून बेशिस्त, मनमानी करणाऱ्या मुजोर कर्मचाऱ्यांवर लक्ष केंद्रित करून त्यांना चाप बसवण्यात येत असल्याने या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.आवश्यक व गरजेच्या प्रशासकीय फायलींची पूर्तता करण्याऐवजी त्या २००५-०६ च्या पुरामध्ये वाहून गेल्याची खोटी माहिती या कर्मचाऱ्यांकडून वेळोवेळी दिली जात असल्याच्या वृत्तास येथील कार्यकारी अभियंता उमेश पवार यांनी दुजोरा दिला आहे. स्वत:च्या टेबलवर राहण्याऐवजी अन्यत्र येजा करण्याची बेशिस्ती या कर्मचाऱ्यांमध्ये वाढीला लागली असता ती कमी करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजनादेखील कराव्या लागत असल्याची खंत व्यक्त करून त्यात मोठ्या प्रमाणात सुधारणा झाल्याचा दावाही त्यांच्याकडून केला जात आहे. विनाकारण फायली अडवल्याचा अनुभव या कार्यालयास भेट देणाऱ्यांनी व्यक्त केला आहे. कार्यालयीन वेळेत इतरत्र फिरणे, कार्यालयात उशिरा येणे, आजारपणाचे खोटे कारण देऊन वेळ दिलेल्या दिवशी कार्यालयात गैरहजर राहणे, काही कागदपत्रांची पूर्तता करण्याऐवजी ती महापुरात वाहून गेल्याची सांगून उडवाउडवीची उत्तरे देणे, फायलीतील महत्त्वाचे कागद गहाळ करणे आदी मनमानी होत असे. मात्र, दोन वर्षांच्या कालावधीपासून त्यास मोठ्या प्रमाणात आळा घालून मुजोर कर्मचाऱ्यांना ताळ्यावर आणल्याचे पवार यांनी सांगितले.आजारपणाचे कारण देऊन सतत गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना वैद्यकीय मंडळाकडे सुपूर्द करून फिटनेस सर्टिफिकेट आणण्यास भाग पाडले जात असल्याचा दावा पवार यांनी केला. त्यासाठी पिंगट या कर्मचाऱ्याचे उदाहरण त्यांनी दिले. सलग दोन वर्षे या कार्यालयास कायमस्वरूपी अधिकारी न मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांची मनमानी होती. पण, आता कार्यालयाच्या सर्व अभिलेखांचे वर्गीकरण करून त्यांचे जतन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)>कामकाजात सुसूत्रता आणून मनमानी संपुष्टातसलग दोन वर्षे या कार्यालयास कायमस्वरूपी अधिकारी न मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांची मनमानी होती. आता मात्र, परिस्थिती बदलली आहे. जुनी कागदपत्रेदेखील आता उपलब्ध असल्याची पुष्टी पवार देत आहेत. एवढेच नव्हे तर कोऱ्या कागदावर घेतल्या जाणाऱ्या स्वाक्षरीची पद्धत बदलून आता कार्यालयीन टिप्पणी व सर्व कागदपत्रे फायलीत उपलब्ध केली आहेत. यातून कामकाजात सुसूत्रता आणून त्यांची मनमानी व मुजोरी संपुष्टात आणल्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणल्याचे पवार यांनी मान्य केले.