शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

पुरातत्त्व खात्याला तत्त्वच उरले नाही

By admin | Updated: January 25, 2016 02:45 IST

महाराष्ट्रात गडकिल्ल्यांची संपूर्णत: दुरवस्था झाली आहे. ज्या पुरातत्त्व खात्याला तत्त्वच शिल्लक राहिलेले नाही त्या खात्याकडून गडकिल्ल्यांचे संवर्धन कसे होणार

सिकंदर अनवारे,  महाड/दासगावमहाराष्ट्रात गडकिल्ल्यांची संपूर्णत: दुरवस्था झाली आहे. ज्या पुरातत्त्व खात्याला तत्त्वच शिल्लक राहिलेले नाही त्या खात्याकडून गडकिल्ल्यांचे संवर्धन कसे होणार, असा प्रश्न शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयाच्या माध्यमातून पाचाड आणि किल्ले रायगडावर आयोजित रायगड महोत्सवाच्या सांगता समारंभात ते बोलत होते. समारंभात उद्धव ठाकरे यांनी रायगडावरील विविध जिवंत देखावे पाहिले. राजदरबारात यावेळी शिवराज्याभिषेक सोहळ्याचा देखावा सादर करण्यात आला. बाजारपेठेतून पुढे जाताना ठाकरे यांनी शिवसमाधीचे दर्शन घेतले. पाचाड येथील शिवसृष्टीजवळील सभेस मार्गदर्शन करताना ठाकरे यांनी नितीन देसाई यांनी केलेल्या किल्ले रायगडावरील जिवंत देखाव्यांचे कौतुक केले. पुरातत्त्व खात्याच्या दुर्लक्षामुळे गडावर काहीही शाबूत राहिले नसल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. महाराष्ट्रातील गडांचे ऐतिहासिक महत्त्व माहीत नसणाऱ्या पुरातत्त्व खात्याच्या हातात राज्यातील गड आहेत. पुरातत्त्व विभागाच्या नियमाप्रमाणे सोमनाथ मंदिर कधीही झाले नाहीत तर राम मंदिर कधीही उभे राहणार नाही, असे ठाकरी शैलीतील विधान करीत गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी शिवसेना शासनासोबत राहील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. समारोप सोहळ्याला विधान परिषद सभापती हरीभाऊ बागडे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, छ. संभाजी राजे, आमदार भारत गोगावले, आमदार मनोहर भोईर, इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे हेदेखील व्यासपीठावर उपस्थित होते.