शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांचे मनमानी वाटप

By admin | Updated: April 3, 2016 03:50 IST

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत ३८ विधानसभा मतदारसंघांमध्ये वाटण्यात आलेल्या १४८ कोटी रुपयांमधील घोटाळे आता समोर येत आहेत. सीआयडीने पुणे जिल्ह्याबाबत

मुंबई : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत ३८ विधानसभा मतदारसंघांमध्ये वाटण्यात आलेल्या १४८ कोटी रुपयांमधील घोटाळे आता समोर येत आहेत. सीआयडीने पुणे जिल्ह्याबाबत केलेल्या तपासात नियमबाह्य वाटप करण्यात आल्याचे सिद्ध झाले आहे. बीडसह सहा जिल्ह्यांमधील वाटपाची चौकशी आता सुरू करण्यात आली आहे. आघाडी सरकार असताना राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पुणे जिल्ह्यात महामंडळामार्फत मातंग समाज महिला समृद्धी योजनेंतर्गत २ हजार ५०० लाभार्थींना १२ कोटी ५० लाख रुपयांचे वाटप करण्यात आल्याचे दाखविण्यात आले. धक्कादायक म्हणजे वाटपाच्या आधी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून लाभार्थींची यादी मंजूर करवून घ्यायला हवी होती. तसे न करता वाटप झाल्यावर परवानगी घेण्यात आली. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी ती कशी दिली, असा प्रश्नही यानिमित्ताने समोर आला आहे. सुरुवातीला ३८ मतदारसंघांमध्ये प्रत्येकी ५ कोटी रुपये वाटण्यात आल्याची माहिती समोर आली होती. तथापि, आता वजनदार नेत्यांनी आपापल्या जिल्ह्यात अधिक पैसा पळविल्याचेही पुढे येत आहे. वाटपाची एकूण रक्कम १४८ कोटी रुपये असल्याचे सीआयडीच्या सूत्रांनी सांगितले. महामंडळातील महाघोटाळ्याची चौकशी करीत असलेल्या सीआयडीने टेस्ट केस म्हणून पुणे जिल्ह्यातील वाटपाची तपासणी केली. लाभार्थींकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न करताच पैसा वाटण्यात आला. आता या कागदपत्रांची पूर्तता करवून घेण्यासाठी महामंडळाच्या अधिकाऱ्यांची धडपड सुरू आहे. धक्कादायक म्हणजे बऱ्याच लाभार्थ्यांचा ठावठिकाणा लागत नसल्याची माहिती आहे. बीडमध्ये २८ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका बड्या नेत्याच्या बंगल्यावरून हे वाटप झाल्याचे सांगितले जाते. वाटपादरम्यान एकच गर्दी उसळली होती. महिला समृद्धी योजनेंतर्गत २ कोटी रुपये अमरावती जिल्ह्यासाठी आले आणि ते परस्पर गोंदिया जिल्ह्याकडे वळविण्यात आल्याचीही माहिती आहे. सीआयडीच्या सूत्रांनी सांगितले की, हे ३८ मतदारसंघ ज्या-ज्या जिल्ह्यांत येतात तिथे प्रत्येक ठिकाणी आम्ही चौकशी करू. सध्या सहा जिल्ह्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. (विशेष प्रतिनिधी)बेअरर चेकने पैसा दिलाबऱ्याच ठिकाणी बेअरर चेकने लाभार्थींना पैसा देण्यात आला, असे सूत्रांनी सांगितले. आता सीआयडीने बेअरर आणि क्रॉस चेकने किती आणि कोणाला वाटप करण्यात आले याची माहिती मागविली आहे.घोटाळ्याप्रकरणी आणखी दोघांना अटकसाठे महामंडळातील घोटाळ्याप्रकरणी महामंडळाचे क्षेत्रिय व्यवस्थापक एच. व्ही. दळवी आणि रवी रामदास नाडे यांना सीआयडीच्या पुणे येथील पथकाने शुक्रवारी जालना येथे अटक केली. दळवी यांनी महामंडळाचे ९ कोटी रुपये महाघोटाळ्यातील मुख्य आरोपी रमेश कदम यांच्या सूतगिरणीकडे वळविल्याचा आरोप आहे. नाडे याला महामंडळातून लाखो रुपये देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.