शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
3
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
4
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
5
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
6
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
7
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
8
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
9
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
10
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
11
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
12
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
13
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
14
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
15
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
16
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
17
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
18
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
19
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
20
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी

रत्नागिरीतील मत्स्यालय १९पासून खुले

By admin | Updated: December 9, 2014 23:18 IST

मत्स्यालयामध्ये गोड्या पाण्यातील माशांच्या व सागरी माशांच्या जवळपास १०० प्रजाती

रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राने विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. किसन लवांडे यांच्या मार्गदर्शनाखाली झाडगाव, रत्नागिरी येथे एक प्रेक्षणीय असे मत्स्यालय सुरु केले आहे. या मत्स्यालयाचे उद्घाटन डॉ. लवांडे यांच्याहस्ते करण्यात आले. १९पासून ते पर्यटकांसाठी खुले होत आहे.याप्रसंगी संशोधन संचालक, महाराष्ट्र कृषी परिषद, पुणेचे डॉ. शिंगारे, विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. उत्तम महाडकर, विद्यापीठ अभियंता दिलीप महाले, मत्स्य महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विजय जोशी, संशोधन केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, डॉ. हुकमसिंह धाकड व अभिरक्षक डॉ. संतोष मेतर, मत्स्य महाविद्यालय, शिरगावचे सर्व विभागप्रमुख व प्राध्यापक तसेच सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, झाडगावचे सर्व अधिकारी व कर्मचारी, नारळ संशोधन केंद्राचे खांडेकर, कृषी संशोधन केंद्र, शिरगावचे वाघमोडे उपस्थित होते. हे मत्स्यालय गुरुवार, ११ डिसेंबर रोजी पर्यटकांसाठी खुले करण्यात येणार आहे.मत्स्यालयामध्ये गोड्या पाण्यातील माशांच्या व सागरी माशांच्या जवळपास १०० प्रजाती ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये अरोवाना मासा, हम्पी हेड फ्लॉवर हॉन मासा, डिस्कस मासे असे गोड्या पाण्यातील आकर्षक मासे तर लायन फिश, फिदर स्टार फिश, बटर फ्लाय माशांच्या विविध प्रजाती, निमो मासे व डॅमसेल माशांच्या विविध प्रजाती असे विविध सागरी मासे ठेवले असल्याने मत्स्य शौकिनांसाठी ते नक्कीच आकर्षण ठरतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. प्लांटेड अ‍ॅक्वेरिअमच्या शौकिनांकरिता विविध २० प्रकारच्या पाणवनस्पतींनी सजविलेले व आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करुन सजविलेले प्लांटेड अ‍ॅक्वेरिअमही विशेष लक्ष वेधून घेत आहेत.मत्स्य संग्रहालयामध्ये विविध २५४ समुद्री जलचर प्रजाती रसायनामध्ये जतन करुन ठेवण्यात आल्या आहेत. तसेच शंख - शिंपल्यांच्या विविध प्रजातीही प्रदर्शनामध्ये ठेवल्या आहेत. मत्स्य संग्रहालयातील डॉल्फीन मासा, ४० फूटी लांबीचा महाकाय देवमाशाचा सांगाडा व ५० वर्षांहून जास्त काळ जतन केलेले जीवंत कासव पर्यटकांचे विशेष लक्ष वेधतात. मत्स्यालय व मत्स्य संग्रहालयास विद्यार्थ्यांनी व पर्यटकांनी भेट दिल्यास त्यांच्या ज्ञानामध्ये नक्कीच भर पडेल. पर्यटक तसेच शालेय विद्यार्थी यांच्यासाठी आठवड्याचे सातही दिवस सकाळी १० ते सायंकाळी ५.४५ या वेळेत मत्स्यालय खुले असेल.या कार्यक्रमाकरिता डॉ. हुकमसिंह धाकड, डॉ. बी. आर. चव्हाण, अभिरक्षक डॉ. संतोष मेतर, सहायक संशोधन अधिकारी नरेंद्र चोगले, सचिन साटम, कुलकर्णी ,व्ही. आर. सदावर्ते, ए. एन. सावंत, महेश पाडावे, छाया चव्हाण कर्मचारीवर्गाने विशेष मेहनत घेतली. (प्रतिनिधी)