शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

मंजूर १०० कोटी, मिळाले १४ कोटी

By admin | Updated: December 14, 2014 00:38 IST

राज्यात सत्ताबदल झाला असला तरी विदर्भ आणि मराठवाड्याचे भाग्य मात्र बदलल्याचे दिसून येत नाही. राज्य सरकारकडून दोन्ही विभागांसाठी मंजूर १०० कोटी रुपयांचा विशेष निधी अद्याप मिळालेला नाही.

सरकार बदलले : विदर्भ-मराठवाड्याची थट्टा कायमकमल शर्मा - नागपूर राज्यात सत्ताबदल झाला असला तरी विदर्भ आणि मराठवाड्याचे भाग्य मात्र बदलल्याचे दिसून येत नाही. राज्य सरकारकडून दोन्ही विभागांसाठी मंजूर १०० कोटी रुपयांचा विशेष निधी अद्याप मिळालेला नाही. याअंतर्गत आघाडी शासन काळात मिळालेले १४ कोटी रुपये सुद्धा खर्च करण्याच्या अटींमुळे पडून आहेत. अनुशेष निर्मूलन आणि संतुलित प्रादेशिक विकासासाठी राष्ट्रपतींच्या आदेशानुसार वैधानिक विकास मंडळ स्थापन करण्यात आले. आपले विदर्भ प्रेम जगजाहीर करण्यासाठी या मंडळांच्या कामकाजाचा कालावधी आणखी पाच वर्षे वाढवण्याची शिफारस नवीन सरकारच्या मंत्रिमंडळाने केली. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र हे राज्यातील तिन्ही मंडळ ३१ मार्च २०१५ नंतरही अस्तित्वात राहतील. परंतु मंडळांना देण्यात येणाऱ्या विशेष निधीचा मात्र सरकारला विसर पडला आहे. सरकार तिन्ही मंडळांना २००९-१०पर्यंत एकूण १०० कोटी रुपयांचा विशेष निधी उपलब्ध करून देत असे. लोकसंख्येच्या आधारावर सर्वाधिक ४० कोटी रुपये विदर्भाला मिळत होते. मंडळांनी केवळ अभ्यासाचे काम करावे, असे सांगत आघाडी शासनाने विशेष निधी बंद केला होता. दरम्यान लोकसभा निवडणुकीत झालेला दारुण पराभव आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आघाडी सरकारने पावसाळी अधिवेशनानंतर विकास निधी देण्याचा निर्णय घेत प्रत्येक मंडळाला १०० कोटी रुपये देण्याची घोषणा केली. सरकारने घोषणा केली परंतु निधी मात्र दिला नाही.खूप आरडाओरड झाल्यावर १४ कोटी रुपये प्रदान करण्यात आले. परंतु हा निधी खर्च करण्याच्या अटी खूप जटील आहेत. त्यामुळे हा निधी खर्च कसा करायचा, असा प्रश्न मंडळापुढे पडला. अधिसूचनेनुसार या निधीपैकी ५० टक्के खर्च हा मानव विकास योजनांवर, ५ टक्के नवीन योजनांवर, ५ टक्के आदिवासी विकास, ३ टक्के अपंगांसाठी आणि उर्वरित रक्कम रस्ते, गटार आणि नाल्यांची कामे सोडून इतर कामांवर खर्च करायचा आहे. मंडळांना नवीन सरकारकडून खूप अपेक्षा होत्या. परंतु त्यांच्या पूरक मागण्यांमध्ये सुद्धा याचा उल्लेख नाही. अधिकारी आता दावा करीत आहेत की, हा निधी दुसऱ्या कामासाठी वळविण्यात आला असेल. खर्च कसा करावा विदर्भ वैधानिक विकास मंडळाने वित्त व योजना मंत्रालयाला पत्र लिहून विचारणा केली आहे की, मिळालेला विकास निधी खर्च कसा करायचा. मंडळाने जटील अटी हटविण्याची विनंती सुद्धा केली आहे. जिल्हाधिकारी आणि संंबधित अधिकाऱ्यांसोबत चार बैठका घेऊन मंडळाने प्रस्ताव मागविले आहे. काही प्रस्ताव आले सुद्धा. परंतु कोणत्या कामासाठी निधी दिला जावा, हे स्पष्ट नाही. याच महिन्यात होणाऱ्या मंडळाच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार असल्याची शक्यता आहे.