शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

वनजमिनीच्या प्रस्तावाला नागपुरातच मिळणार मंजुरी

By admin | Updated: September 8, 2015 22:54 IST

नवे दहा विभाग : केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाचा निर्णय

अनंत जाधव -सावंतवाडी  देशात ठिकठिकाणी उद्भवणाऱ्या वनजमिनीचा प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र सरकारच्या वन व पर्यावरण मंत्रालयाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. वनजमिनीच्या मंजुरीसंदर्भात कोणतीच फाईल भोपाळला न पाठविता प्रत्येक राज्यांना जवळचे झोन तयार करून दिले आहेत. देशात नव्याने दहा ठिकाणी झोन तयार केले असून, यात महाराष्ट्र व छत्तीसगड या दोन राज्यांना ‘वेस्ट सेंट्रल झोन’ म्हणून नागपूरला मान्यता देण्यात आली आहे.यासाठी अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक ए. एन. शरण यांची नेमणूक करण्यात आली आहे. हे कार्यालय चार महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आले आहे.महाराष्ट्रात कोठेही वनजमिनीचा प्रश्न उद्भवला तर एक सरकारी फाईल स्थानिक वनविभागाच्या कार्यालयातून विभागीय कार्यालयात, तेथून नागपूर, त्यानंतर मंत्रालय मुंबई असा प्रवास करीत ती भोपाळ (मध्य प्रदेश) व त्यानंतर दिल्लीपर्यंत जाते. या फाईलमध्ये एक जरी चूक असली, तरी ती फाईल पुन्हा मागे येत असे. अशी राज्यात वर्षानुवर्षे अनेक कामे प्रलंबित आहेत. केंद्र सरकारने चार महिन्यांपासून ही प्रक्रिया खंडित केली आहे.वन व पर्यावरण मंत्रालयाने देशात दहा ठिकाणी झोन तयार केले असून, प्रत्येक झोनने देशातील राज्ये जोडली आहेत, तर नऊ ठिकाणी अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षकाच्या दर्जाचे अधिकारी आहेत. केंद्र सरकारने या राज्यांसाठी नवीन झोन तयार केल्याने आता वनजमिनीचा प्रश्न लवकरात लवकर निकालात निघणार आहेत. ही कार्यालये चार महिन्यांपूर्वी उघडण्यात आली असून, दहा झोनमध्ये नऊ अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या सर्व झोनवर केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाचे लक्ष राहणार आहे.सिंधुदुर्गला अधिक होणार फायदासिंधुदुर्ग जिल्ह्यात वनजमिनीचे अनेक प्रस्ताव प्रलंबित आहेत. जिल्ह्यातील साडेबेचाळीस हजार हेक्टर जमीन वनसंज्ञेखाली आहे, तर अनेक ठिकाणी कबुलायतदार गावकर, आकारीपड असे सात-बारा उताऱ्यावर लागले आहेत. शिरशिंगे, टाळंबा धरण प्रकल्प, सोनवडे-कोल्हापूरला जोडला जाणारा घोडगे रस्ता, आदींना वनजमिनीचा फटका बसल़्ाा. त्याशिवाय मायनिंग कंपन्यांनाही वनजमिनीचा गुंता सोडविण्यास नागपूर हे सोपे ठिकाण होणार आहे.शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याने अनेक प्रश्न लवकर मार्गी लागणार आहेत. त्याचा फायदा सर्वांनाच होईल. जिल्ह्यातील अनेक प्रस्ताव हे भोपाळ तसेच अन्य ठिकाणी प्रलंबित असून, तेही प्रश्न सुटतील.- एस. रमेशकुमार, उपवनसंरक्षक, सावंतवाडीअसे असणार वनझोनसाऊथ झोन बंगलोरला राहणार असून, यात कर्नाटक, केरळ, गोवा, लक्षद्वीप, आदी राज्ये जोडण्यात आली आहेत. भोपाळला दमण, गुजरात, मध्य प्रदेश ही राज्ये, भुवनेश्वरला ओरिसा व पश्चिम बंगाल ही दोन राज्ये जोडली असून आंध प्रदेश, तेलंगणा, तमिळनाडू, पुद्दुचेरी, अंदमान निकोबार ही राज्ये साऊथ वेस्टर्न झोन चेन्नईला जोडली गेली आहेत. छत्तीसगड, हरियाणा, जम्मू-काश्मीर आणि पंजाब नॉर्थ साऊथ झोन तयार करून चंदिगडला जोडले आहे, तर बिहार व झारखंडला वेस्टर्न सेंट्रल झोन रांची येथे जोडण्यात आले आहे. महाराष्ट्र-छत्तीसगड वेस्टर्न सेंट्रल झोन नागपूरला जोडण्यात आले आहे.