शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्प अहवाल निविदेला मंजुरी

By admin | Updated: May 20, 2016 01:42 IST

उच्च क्षमता द्रुतगती मार्गाचा (एचसीएमटीआर) प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठीच्या ९० लाख रुपये खर्चाच्या कामाला स्थायी समितीने मंगळवारच्या बैठकीत मंजुरी दिली.

पुणे : शहरातील वाहतुकीची कोंडी कमी व्हावी यासाठी तब्बल १८ वर्षांपूर्वी प्रस्तावित केलेल्या उच्च क्षमता द्रुतगती मार्गाचा (एचसीएमटीआर) प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठीच्या ९० लाख रुपये खर्चाच्या कामाला स्थायी समितीने मंगळवारच्या बैठकीत मंजुरी दिली. मुंबईस्थित स्तुप कन्सल्टंट या कंपनीला हे काम देण्यात आले आहे. येत्या ४ महिन्यांत त्यांनी ते पूर्ण करायचे असून, त्यानंतर अनेक वर्षे रेंगाळलेल्या या रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाला गती मिळणे अपेक्षित आहे. माजी उपमहापौर, नगरसेवक आबा बागुल यांनी ही माहिती दिली.एकूण ३५ किलोमीटर अंतराचा हा मार्ग महापालिकेच्या १७ पेठांमधून जातो. बोपोडी, औंध, भांबुर्डा, एरंडवणा, कोथरूड, हिंगणे, सदाशिव पेठ, पर्वती, वानवडी, हडपसर, मुंढवा, वडगाव शेरी, लोहगाव, येरवडा, धानोरी व कळस असा हा भाग आहे. यातील कळस व धानोरी या भागातील रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. लोहगाव येथे अंशत: काम झाले आहे. औंध व येरवडा येथे हा संपूर्ण रस्ता सरकारी जागेतून जातो, त्यामुळे ती जागा संपादन करण्यासाठी सरकारकडे प्रस्ताव दिला आहे. अन्य ठिकाणच्या जागांची मोजणी बाकी असून, त्याचाच प्रकल्प अहवाल स्तूप कंपनीने करायचा आहे.या रस्त्याच्या कामाला गती मिळावी यासाठी बागुल यांच्या प्रयत्नांमधून महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी त्यासाठी महापालिकेत स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे. रस्त्यासाठीची जागा संपादन करण्यात सातत्याने अनेक अडचणी येत आहेत व महापालिका त्याकडे लक्ष द्यायला तयार नाही असे बागुल म्हणाले. प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम व्यावसायिक कंपनीला दिल्याने आता भूसंपादनातील सर्व अडचणी समोर येतील तसेच भविष्यातील वाहतुकीचा अंदाज घेऊन रस्त्याचे डिझाईन तयार होईल असा विश्वास बागूल यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी) >अंतर ३५ किलोमीटरएकूण ३५ किलोमीटर अंतराचा हा मार्ग महापालिकेच्या १७ पेठांमधून जातो. बोपोडी, औंध, भांबुर्डा, एरंडवणा, कोथरूड, हिंगणे, सदाशिव पेठ, पर्वती, वानवडी, हडपसर, मुंढवा, वडगाव शेरी, लोहगाव, येरवडा, धानोरी व कळस असा हा भाग आहे.