शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

शिधापत्रिका बायोमेट्रिक करण्याच्या खर्चास मंजुरी

By admin | Updated: August 28, 2015 02:14 IST

राज्यभरातील दोन कोटी ३७ लाख १० हजारांहून अधिक शिधापत्रिका आधारकार्डच्या लिंकला जोडून त्या बायोमेट्रीक करण्यात येणार आहेत. गोदामापर्यंतच्या सर्व व्यवहारांचे संगणकीकरण करण्यात येणार

- नारायण जाधव,  ठाणेराज्यभरातील दोन कोटी ३७ लाख १० हजारांहून अधिक शिधापत्रिका आधारकार्डच्या लिंकला जोडून त्या बायोमेट्रीक करण्यात येणार आहेत. गोदामापर्यंतच्या सर्व व्यवहारांचे संगणकीकरण करण्यात येणार असून त्यासाठी राज्य सरकार १९८ कोटी ६४ लाख रुपये खर्च करणार आहे. राज्याच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या माध्यमातून रेशनकार्डद्वारे वितरीत करण्यात येणाऱ्या अन्नधान्य वितरणात होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या समूळ उच्चाटनासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतच्या खर्चास अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने मंगळवारी प्रशासकीय मान्यता दिली. यात केंद्र सरकारने दिलेल्या ६९ कोटी ७३ लाख आणि राज्य सरकारच्या १०३ कोटी ९९ लाख खर्चास यापूर्वीच मंजुरी देण्यात आली आहे. केंद्राची दुसऱ्या टप्प्यातील मदत अद्याप आलेली नाही. राज्यात सुमारे दोन कोटी ३७ लाख १० हजार ६६६ रेशनकार्डधारक आहेत. त्यात बीपीएल- ४५ लाख ३४ हजार ८३६, अंत्योदय कार्डधारक- २४ लाख ७२ हजार ७५३, केशरी कार्डधारक- एक कोटी ४६ लाख ४५ हजार २३, पांढरे कार्डधारक- १९ लाख ९३ हजार १८६ आणि अन्नपूर्णाधारक ६४ हजार आहेत. या सर्वांना ५१ हजार ५०० हून अधिक रेशन दुकानांच्या माध्यमातून साखर, गहू, तांदूळ, केरोसीनसह इतर अन्नधान्याचा पुरवठा केला जातो.मात्र, या वितरण व्यवस्थेत रेशन दुकानदारांपासून गोदामचालक आणि सरकारी अधिकाऱ्यांपर्यंतच्या साखळीतील काही लोकांमुळे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी आहेत. गहू, तांदळाची बेकरीमालकांना काळ्याबाजारात विक्री होत असल्याचा आरोप आहे. त्यामुळेच बायोमेट्रीक प्रणाली स्वीकारण्यात आली आहे.असे असेल बायोमेट्रिक कार्ड सध्याच्या जुनाट रेशनकार्डची जागा हे अत्याधुनिक बायोमेट्रीक स्मार्टकार्ड घेणार आहे. ते आधारकार्डशी जोडले जाणार आहे. कार्डधारकाच्या नावासह कुटुंबातील सदस्यांचा संपूर्ण तपशील, त्यांच्या हातांच्या बोटांचे ठसे, डोळ्यांच्या बुब्बुळाच्या इमेजेस त्यात असतील. या कार्डची नोंद रेशन दुकानदारांकडील संगणकातही राहणार आहे. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांव्यतिरिक्त त्याचा वापर अन्य कुणाला करता येणार नाही.सध्या एखाद्या रेशनकार्डचा वापर करून दुसरे कुटुंब ते उधार मागून करू शकते. मात्र, बायोमेट्रीक कार्डचा वापर तशा प्रकारे करता येणार नाही. जरी दुसऱ्याला ते दिले तरी संबंधित कुटुंबातील एका सदस्याला कार्ड नेणाऱ्या शेजाऱ्यासोबत जावे लागेलच. त्याशिवाय, त्याला संबंधित दुकानदार धान्य देऊ शकणार नाही.