शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीसंदर्भात नियुक्त्या रखडल्या

By admin | Updated: January 17, 2017 02:00 IST

सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नियुक्त्यांचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिल्यानंतर संबंधितांना रुजू करण्याचे काम प्रलंबित आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नियुक्त्यांचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिल्यानंतर संबंधितांना रुजू करण्याचे काम प्रलंबित आहे. आयुक्त दिनेश वाघमारे दिल्ली दौऱ्यावर असल्याने आरओची नियुक्तीसाठीची प्रक्रिया रखडली आहे. महापालिका निवडणूक दि.२१ फेब्रुवारीला होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार विविध कक्षांची स्थापना, निवडणूक कार्यालये, मतमोजणी कार्यालये, निर्णय अधिकारी आणि कर्मचारी यांना रुजू करण्यांसदर्भात कार्यवाही सुरू झालेली आहे. शनिवारीच शहरातील ११ निवडणूक कार्यालये सज्ज झालेली आहेत. त्या ठिकाणच्या आरओची नियुक्ती विभागीय आयुक्तांनी केली आहे. त्यासंदर्भातील आदेशही विभागीय आयुक्तांनी शनिवारी दिले आहेत. त्यामुळे सोमवारी हे अधिकारी रुजू होतील, अशी अपेक्षा होती. मात्र, आयुक्त दिल्ली दौऱ्यावर असल्याने महापालिका स्तरावरील आदेश काढण्यात आलेले नाहीत, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. महापालिकेच्या निवडणूक विभागात आजअखेर सुमारे १५२ सीडींची, तर १३० छापील याद्यांची विक्री झाली असल्याचे डॉ. माने यांनी सांगितले. (प्रतिनिधी)>१८२ हरकती दाखलराज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांच्या सूचनेनुसार नागरिकांसाठी मतदार यादी प्रसिद्ध करून त्यावर हरकती मागविण्यात आल्या आहेत. त्यानुसार आजअखेर सुमारे १८२ नागरिकांच्या हरकती प्राप्त झाल्या आहेत. हरकती घेण्यासाठी दि. १७ जानेवारी २०१७ ही अंतिम तारीख असल्याची माहिती निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त डॉ. यशवंत माने यांनी दिली.