शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अरे व्वा.. ५४ दिवसांत ‘अनुकंपा’तून नोकरी; शासन धोरणात बदल

By समीर देशपांडे | Updated: July 22, 2025 12:23 IST

उद्यापासून प्रक्रिया सुरू

समीर देशपांडेकाेल्हापूर : राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने १९७६ साली सुरू केलेल्या अनुकंपा नियुक्ती धोरणामध्ये आमूलाग्र बदल केला आहे. याहीपुढे जात मुख्यमंत्र्यांच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमात ही भरती करण्यात येणार असून उद्या सर्व जिल्हाधिकारी या विषयावर बैठक घेणार आहेत. १५ सप्टेंबरपर्यंत म्हणजे केवळ ५४ दिवसांत आता पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्रेच देण्यात येणार आहेत. यासाठीचे वेळापत्रकच शासनाने जाहीर केले आहे.राज्य शासनाच्या गट ‘अ’ ते गट ‘ड’ मधील शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याचे निधन झाल्यास त्या कुटुंबाला आर्थिक संकटातून सावरण्यासाठी अनुकंपा नियुक्ती केली जाते. मृत कर्मचाऱ्याची पत्नी किंवा पती, अविवाहित मुलगा, विवाहित मुलगी, मृत्यूपूर्वी कायदेशीररीत्या दत्तक घेतलेला अविवाहित मुलगा, विवाहित मुलगी, घटस्फोटित, परितक्त्या, विधवा मुलगी किंवा बहीण यांना या धोरणानुसार नियुक्ती देण्यात येते.शासनाच्या प्रत्येक विभागामध्ये संबंधितांचे अर्ज घेतले जातात आणि त्याची अद्ययावत यादी तयार करण्यात येते. ज्या पद्धतीने जागा रिक्त होतील त्यानुसार ठरलेल्या प्रमाणात त्या भरल्या जातात. आतापर्यंतचे या धोरणांचे ४६ शासन आदेश एकत्रित करून नवा शासन आदेश १७ जुलै रोजी जारी करण्यात आला आहे.

प्रमुख बदल खालीलप्रमाणे

  • कर्मचाऱ्याच्या निधनानंतर १ वर्षात अर्ज करणे बंधनकारक होते. ही मुदत आता ३ वर्षे करण्यात आली आहे.
  • अर्जाबाबत विलंब क्षमापित करण्यासाठी आधी प्रस्ताव विभागीय आयुक्त किंवा उच्चस्तरीय समितीच्या मुख्य सचिवांकडे पाठवावा लागत असे. आता तो जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येईल.
  • आधीच्या धोरणानुसार ४५ वयानंतर संबंधिताचे नाव यादीतून बाहेर काढले जात असे. परंतु आता या ठिकाणी नाव बदलण्याची सोय करण्यात आली आहे.
  • अनुकंपा नोकरीसाठी एकदा जे नाव दिले जाईल ते बदलता येत नव्हते. आता हे नाव बदलण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
  • गट क आणि ड या दोन गटात आधी बदल करणे शक्य नव्हते. परंतू आता गटामध्येही बदल करणे शक्य आहे.