शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकर भवनासाठी आर्किटेक्टची नियुक्ती

By admin | Updated: August 2, 2016 05:46 IST

आंबेडकर भवनाचे व प्रकाश आंबेडकर यांच्या प्रिंटिंग प्रेसचे किती नुकसान झाले आहे, याची पाहणी करण्यासाठी उच्च न्यायालयाने सोमवारी आर्किटेक्ट शशी प्रभू यांची नियुक्ती केली.

मुंबई : आंबेडकर भवनाच्या पाडलेल्या भागाची पुनर्बांधणी करणे शक्य आहे का आणि आंबेडकर भवनाचे व प्रकाश आंबेडकर यांच्या प्रिंटिंग प्रेसचे किती नुकसान झाले आहे, याची पाहणी करण्यासाठी उच्च न्यायालयाने सोमवारी आर्किटेक्ट शशी प्रभू यांची नियुक्ती केली. प्रभू यांना या सर्व मुद्द्यांवर ८ आॅगस्टपर्यंत उच्च न्यायालयात अहवाल सादर करायचा आहे.दादर येथील ऐतिहासिक आंबेडकर भवन मोडकळीस आल्यासंदर्भात महापालिकेने पीपल इम्प्रूव्हमेंट ट्रस्टला १ जुलै रोजी नोटीस बजावली. या नोटिशीची अंमलबजावणी करत, ट्रस्टने २५ जुलै रोजी आंबेडकर भवनाचा काही भाग पाडला. मात्र, डॉ. बाबासाहेब यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी याविरुद्ध आंदोलन केले, तसेच प्रकाश आंबेडकरांनी ३० जुलै रोजी ‘श्रमदान’ करून पुन्हा आंबेडकर भवन बांधण्याचे आवाहन समर्थकांना केले. त्यामुळे पीपल इम्प्रूव्हमेंट ट्रस्टने उच्च न्यायालयात धाव घेतली. या याचिकेवरील सुनावणी न्या. एस. जे. काथावाला यांच्यापुढे होती. शुक्रवारच्या सुनावणीत उच्च न्यायालयाने प्रकाश आंबेडकर यांच्यासह त्यांच्या समर्थकांना आंबेडकर भवनात प्रवेश करण्यास मज्जाव केला, तसेच आंबेडकर भवन ‘जैसे थे’ ठेवण्याचा आदेशही दिला.सोमवारच्या सुनावणीत उच्च न्यायालयाने आंबेडकर भवन व प्रकाश आंबेडकरांच्या प्रिंटिंग प्रेसचे किती नुकसान झाले? आणि आता या भवनाची पुनर्बांधणी शक्य आहे का, हे तपासण्यासाठी आर्किटेक्ट शशी प्रभू यांची नियुक्ती केली, तसेच न्या. काथावाला यांनी प्रभू यांना ‘बुद्धभूषण’ या प्रिंटिंग प्रेसमध्ये असलेल्या वस्तूंची यादी सादर करण्याचेही निर्देश दिले.प्रकाश आंबेकडर यांच्या वकिलांच्या म्हणण्यानुसार, काही साप्ताहिकांची आणि साहित्यावरील नियतकालिकांची या प्रिंटिंग प्रेसमधून छपाई होत असे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांना प्रिंटिंग प्रेसचे किती नुकसान झाले आहे, हे पाहण्यासाठी तेथे प्रवेश करायचा आहे. सुनावणीदरम्यान न्या. काथावाला यांनी पीपल इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट आणि प्रकाश आंबेडकर यांनी एकत्रितपणे आंबेडकर भवनाचा पुनर्विकास करावा, अशी सूचना केली. मात्र, प्रकाश आंबेडकर यांनी त्यास असहमती दर्शवली. उच्च न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी ८ आॅगस्ट रोजी ठेवली >प्रकाश आंबेडकर यांचा विरोध‘एकत्रितपणे पुनर्विकास करण्याची कोर्टाची सूचना प्रकाश आंबेडकर यांना मान्य नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या भवनाची सुरुवात आणि देखभाल केली आहे. त्यामुळे या भवनाशी नागरिकांच्या भावना जोडल्या गेल्या आहेत,’ असे आंबेडकरांच्या वकिलांनी उच्च न्यायालयाला सांगितले. आहे. (प्रतिनिधी)