शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

निवड होऊनही नियुक्तीसाठी वणवण

By admin | Updated: January 19, 2017 05:46 IST

पोलीस शिपाई भरतीत निवड होऊनही लाल फितीच्या कारभारामुळे वाशिमच्या तरुणाची गेली दोन वर्षे वणवण सुरू आहे.

मुंबई : पोलीस शिपाई भरतीत निवड होऊनही लाल फितीच्या कारभारामुळे वाशिमच्या तरुणाची गेली दोन वर्षे वणवण सुरू आहे. नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला असतानाच, गृह विभागाने राज्यातील जिल्ह्यांतील अशी दप्तर दिरंगाईच्या प्रकरणाची माहिती मागविली आहे. या माहितीनंतर एकदंरीत प्रकरणे मार्गी लावणार आहे. नियुक्तीचे स्वप्न आणखीन लांबणीवर गेल्याने याउमेदवाराच्या अडचणीत भर पडली आहे. त्यामुळे न्याय मिळणार की नाही? असा प्रश्न त्याच्यासमोर आ वासून उभा आहे. वाशिम जिल्ह्याच्या वरुड खुर्दमध्ये राहणारा विठ्ठल सीताराम सुर्वे. वृद्ध आईवडील आणि गतिमंद भावाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर आहे. पार्ट टाईम नोकरी करून शिक्षण पूर्ण केले. पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बांधून त्याने २०१४मध्ये पोलीस शिपाई भरतीत उडी घेतली. २० जून, २०१४च्या वाशीम पोलीस अधीक्षक कार्यालय येथे लागलेल्या अंतिम गुणवत्ता यादीत तो ओबीसीतून (इतर मागासवर्गीय प्रवर्ग) १७६ गुणांसह प्रतीक्षा यादीत प्रथम क्रमांकावर होता. निवड यादीतील राजेश केशव देवळे याने इतर ठिकाणी नोकरी लागल्याने स्वत:ची निवड रद्द करण्याचा अर्ज केला. त्यामुळे सुर्वे त्या ठिकाणी पात्र ठरला. मात्र, त्याची दखल घेणे कोणी गरजेचे समजले नाही. १५ महिन्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून त्याची पोलीस शिपाईपदी निवड झाल्याचे सांगण्यात आले. उशिरा का होईना प्रशासनाने दखल घेतली म्हणून सुर्वे कुटुंबीयांनी सुटकेचा श्वास सोडला. वैद्यकीय चाचणी आणि चारित्र्य पडताळणी झाली. दोन्हींमध्ये पात्र असतानाही नियुक्ती मिळाली नाही. याच काळात अधीक्षक बदलले. नवीन आलेल्या अधीक्षकांनी त्यांना ३० मार्च, २०१६ रोजी पत्र पाठवून प्रतीक्षा यादीचा कालावधी १ वर्षाचा असून, त्यात ३ महिने २८ दिवस उशीर झाल्याचे सांगून नियुक्तीस पात्र नसल्याचे सांगितले. प्रशासनाच्या लाल फितीच्या कारभाराचा आपल्याला फटका का? असा सवाल सुर्वे कुटुंबीय करत आहेत. २०१६ उलटून २०१७ सुरू झाले. मात्र, अजूनही त्याची नियुक्तीसाठीची धडपड सुरू आहे. (प्रतिनिधी)। अप्पर पोलीस महासंचालकांकडून सादर करण्यात आलेल्या अहवालात सामान्य प्रशासन विभागाकडूनही अभिप्राय घेण्यात आला. त्या अभिप्रायात ‘सदर कालमर्यादा नियम पोलीस भरतीकरिता लागू होत नाही,’ असे नमूद करण्यात आल्याचे समजते.त्यामुळे ज्या नियमांच्या आधारे मला डावलण्याचा प्रयत्न केला जात आहे तो चुकीचा असल्याचे सुर्वेचे म्हणणे आहे. नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला. नियुक्तीची स्वप्ने पुन्हा रंगवित असतानाच गृहविभागाच्या अनोख्या न्यायामुळे त्याच्या अडचणीत भर पाडली आहे.न्याय न मिळाल्यास सुर्वेने आत्महत्येचा इशारा दिला आहे. त्यामुळे प्रशासन याकडे काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे आहे. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, ते संपर्कात येऊ शकले नाहीत.