शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

७३० कृषिसेवकांना मिळणार नियुक्ती, ‘मॅट’चा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 00:57 IST

कृषिसेवकांची ७३० पदे भरण्यासाठी घेतलेल्या परीक्षेतील गुणांच्या आधारे तयार करण्यात आलेल्या विभागवार निवड याद्यांनुसारच नेमणुका करण्याचा आदेश, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) दिल्याने, गेले वर्षभर प्रतीक्षा करणा-या यशस्वी उमेदवारांना अखेर नियुक्त्या मिळणार आहेत.

- विशेष प्रतिनिधी

मुंबई : कृषिसेवकांची ७३० पदे भरण्यासाठी घेतलेल्या परीक्षेतील गुणांच्या आधारे तयार करण्यात आलेल्या विभागवार निवड याद्यांनुसारच नेमणुका करण्याचा आदेश, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) दिल्याने, गेले वर्षभर प्रतीक्षा करणा-या यशस्वी उमेदवारांना अखेर नियुक्त्या मिळणार आहेत.या परीक्षेत घोटाळा आणि गैरप्रकार झाल्याचे कारण देत, कृषी खात्याने ही संपूर्ण निवड परीक्षाच रद्द करून, त्याऐवजी अर्जदार उमेदवारांची शालांत व पदविका परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करून, त्यानुसार नेमणुका करण्याचा निर्णय १७ मार्च रोजी घेतला होता.परीक्षेत यशस्वी होऊन निवड यादीत समावेश झालेल्या एकूण २२४ उमेदवांनी याविरुद्ध ‘मॅट’मध्ये एकूण तीन याचिका दाखल केल्या होत्या. ‘मॅट’चे अध्यक्ष न्या. अंबादास जोशी व सदस्य राजीव अग्रवाल यांनी गुरुवारी या याचिका मंजूर केल्या व निवड यादी रद्द करून, त्याऐवजी शैक्षणिक गुणवत्तेवर नेमणुका करण्याचा सरकारचा निर्णय रद्द केला.न्यायाधिकरणाने म्हटले की, सरकारने केलेल्या चौकशीमध्ये १०५ उमेदवारांच्या बाबतीत त्यांचे नाव, लिंग, जन्मतारीख, जात इत्यादीची माहिती परीक्षा झाल्यानंतर बदलण्यात आल्याचे दिसते. यापैकी कोणी निवड यादीतही असतील, तर त्यांच्या माहितीची पूर्ण खातरजमा करून, मगच नेमणुका देण्याचा पर्याय स्वीकारता येईल, पण त्यासाठी सर्वच निवड यादी रद्द करण्याचे काही कारण नाही.न्यायाधिकरणाने असेही म्हटले की, कोणाच्या गुणांमध्ये फेरफार केल्याचे चौकशीतून दिसले नाही. जेव्हा एखाद्या परीक्षेत सर्वव्यापी असा गैरप्रकार होतो व त्याचा लाभ झालेले न झालेले वेगळे काढणे अशक्य असते, त्याच वेळी संपूर्ण परीक्षा रद्द करणे न्यायाचे ठरते, असे सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आहेत. प्रस्तुत परीक्षेत तशी स्थिती नाही. ज्यांच्या बाबतीत संशय आहे, ते ओळखून वेगळे काढणे शक्य आहे. या सुनावणीत अर्जदार परीक्षार्थींसाठी अ‍ॅड. सतीश तळेकर, अ‍ॅड. रंजना तोडणकर व अ‍ॅड. पी. एस. पाठक यांनी काम पाहिले. सरकारतर्फे विशेष वकील एस. के. नायर व सरकारी वकील एस. के. सूर्यवंशी आणि के. बी. भिसे यांनी बाजू मांडली.बाहेरच्या एजन्सीचा घोळकृषी आयुक्तांनी ही परीक्षा घेण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सोपविली. परिषदेने हे काम पुण्याच्या मे. गजाजन एंटरप्रायजेस या बाहेरच्या एजन्सीकडून करून घेतले. परीक्षेसाठी वापरलेले संगणकीय सॉफ्टवेअर तयार करणे, उत्तरपत्रिका तपासून गुण देणे व गुणवत्ता याद्या तयार करणे ही सर्व कामे मे. गजाजन एजन्सीनेच केली. एका टप्प्याला कृषी खात्याच्या प्रध़ान सचिवांनी या गजाजन एजन्सीवर गुन्हा नोंदविण्याचा शेरा फाइलवर लिहिला होता. विधि आणि न्याय विभागाचा सल्ला घेतला असता, त्यांनी प्रतिकूल शेरा दिला होता. विधिमंडळातही यावरून गदारोळ झाला होता.