शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कोपर्डीच्या आरोपींंसाठी सरकारी वकिलाची नियुक्ती

By admin | Updated: October 19, 2016 05:37 IST

दोन आरोपींच्या विनंतीनुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे सरकारी वकील अ‍ॅड़ योव्हान मकासरे यांची नियुक्ती झाली आहे.

अहमदनगर : कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणाबाबत येथील जिल्हा सत्र न्यायालयात मंगळवारपासून न्यायालयीन कामकाजाला सुरुवात झाली़ खटल्यातील दोन आरोपींच्या विनंतीनुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे सरकारी वकील अ‍ॅड़ योव्हान मकासरे यांची नियुक्ती झाली आहे. मकासरे हे आरोपी जितेंद्र शिंदे व संतोष भवाळ यांच्यातर्फे खटला लढविणार आहेत़ आरोपींसाठी सरकारी वकिलाची नियुक्ती झाल्याने बुधवारी या खटल्याच्या सुनावणीला प्रारंभ होणार आहे़ कोपर्डी खटल्यात सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अ‍ॅड़ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाली आहे़ आरोपींकडे वकील नसल्याने पहिल्या दिवशी दोषारोप निश्चितीची प्रक्रिया झाली नाही़ कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे १३ जुलैला अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू बाबुलाल शिंदे, संतोष गोरख भवाळ व नितीन गोपीनाथ भैलुमे (तिघे, रा़ कोपर्डी) यांच्याविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे़ अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्या न्यायालयासमोर या खटल्याचे कामकाज सुरू झाले़ मुख्य आरोपी जितेंद्र बाबुलाल शिंदे, संतोष गोरख भवाळ व नितीन गोपीनाथ भैलुमे यांना मंगळवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते़ शिंदे व भवाळ यांनी वकील न दिल्याने त्यांना न्यायालयाकडून विचारणा झाली असता त्यांनी आम्हाला सरकारी वकील द्यावा, अशी विनंती केली़ तिसरा आरोपी नितीन भैलुमे याच्या बाजूने अ‍ॅड़ प्रकाश आहेर हे खटला चालविणार आहेत़ भैलुमे याच्या वतीने न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आला असून, त्याने मुक्त करण्याची मागणी केली आहे़ सरकारी पक्षाचे वकील उज्ज्वल निकम यांनी सुनावणी सुरू झाल्यानंतर निर्णय घेण्यात यावा, अशी विनंती केली़ न्यायालयाने हा युक्तीवाद मान्य केला़ तीनही आरोपींना सुनावणी सुरू असेपर्यंत नगर येथील सबजेलमध्ये ठेवण्यात यावे, अशी विनंती निकम यांनी न्यायालयाकडे केली.(प्रतिनिधी)>खासगी वकीलपत्र नाकारलेकोपर्डी घटनेतील दोषारोपपत्रात नाव असलेल्या तिघा आरोपींचे वकीलपत्र घेण्यास एक वकील तयार होते़ न्यायालयाकडे त्यांनी तसा अर्जही दिला होता़ मात्र, एका आरोपीने स्वत:चा वकील आधीच निश्चित केला होता़, तर दुसऱ्या दोघांना सरकारी वकील हवा असल्याने हे वकीलपत्र नाकारण्यात आले़निकम यांच्याकडून घटनास्थळाची पाहणी कोपर्डी खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने काम पाहणारे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी, मंगळवारी कोपर्डी येथे जाऊन घटनास्थळाची पाहणी केली़ त्यांच्यासमवेत तपास अधिकारी पोलीस निरीक्षक शशीराज पाटोळे उपस्थित होते़ निकम यांनी पोलिसांकडून पुन्हा एकदा सर्व माहिती घेतली़