शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

लातूरमध्ये टँकर भरणास्थळी प्रतिबंधात्मक आदेश लागू

By admin | Updated: March 21, 2016 03:21 IST

पाण्याचे टँकर भरताना येणारा व्यत्यय लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात एकूण २१ ठिकाणी प्रतिबंधात्मक (कलम १४४) आदेश लागू केले होते. मात्र जिल्ह्यातील १५ ठिकाणचे आदेश रद्द

लातूर : पाण्याचे टँकर भरताना येणारा व्यत्यय लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात एकूण २१ ठिकाणी प्रतिबंधात्मक (कलम १४४) आदेश लागू केले होते. मात्र जिल्ह्यातील १५ ठिकाणचे आदेश रद्द करून शहरातील ६ ठिकाणी उपरोक्त कलम रविवारी लागू केले.टँकर भरणास्थळाच्या ५० मीटर्स क्षेत्रात हे आदेश लागू राहणार आहेत. शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली डोंगरगाव बॅरेजेस, निम्न तेरणा, भंडारवाडी तलावातून २५ हजार लिटर्स क्षमतेच्या टँकरद्वारे पाणी आणले जात आहे. त्यामुळे या मार्गावरील शेंद, ताजपूर पाटी, सुगाव पाटी, मसलगा पाटी, गौर पाटी, कवठा पाटी, चिंचोली मोड, हालकी, वांजरखेडा पाटी, तळेगाव, बोरी पाटी, माळकोंडजी आदी ठिकाणी पाणी पुरवठ्यास व्यत्यय येईल, याची शक्यता गृहित धरून १४४ कलम लागू केले होते. मात्र येथील आदेश रद्द करून लातूर शहरातील शासकीय कॉलनी, सरस्वती कॉलनीतील, अंबाजोगाई रोड, गांधी चौक, नांदेड नाका आणि कॉईल नगर येथीली जलकुंभ टँकर पॉर्इंटवर १ एप्रिलपर्यंत १४४ कलम लागू केले आहे. टंचाईमुळे या ठिकाणीही लोकांची तेथे गर्दी होते व भांडणे होतात. आंदोलनेही केली जातात. त्यामुळे पाणी पुरवठ्यास व्यत्यय येतो. हा व्यत्यय येऊ नये या उद्देशाने शहरातील ६ ठिकाणच्या टँकर भरणास्थळावर प्रतिबंधात्मक कलम लागू केल्याचे जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी सांगितले. (प्रतिनिधी)