शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

विधान मंडळाच्या महिला समितीच्या शिफारशी लागू करा- नीलम गोऱ्हे

By admin | Updated: November 7, 2016 21:26 IST

दोन्ही सभागृहांच्या महिला समितीने २००४ मध्ये केलेल्या शिफारशींची तातडीने अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे आमदार निलम गोऱ्हे यांनी सोमवारी खामगाव येथील पत्र परिषदेत सांगितले.

ऑनलाइन लोकमतखामगाव (जि. बुलडाणा), दि. 7 - आदिवासी तसेच इतर निवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थिनींवरील अत्याचार थांबविण्यासाठी विधान मंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या महिला समितीने २००४ मध्ये केलेल्या शिफारशींची तातडीने अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे आमदार निलम गोऱ्हे यांनी सोमवारी खामगाव येथील पत्र परिषदेत सांगितले.नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील बर्डी येथील आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचारानंतर विधी मंडळाच्या दोन्ही सभागृहांनी महिला तदर्थ समिती नेमली होती. आश्रम शाळांमधील विद्यार्थिनींवरील अत्याचार थांबावे यासोबतच विद्यार्थिनींना सुरक्षिततेचे वातावरण मिळावे यासाठी समितीकडून शिफारशी मागविण्यात आल्या होत्या. विधानसभा व विधान परिषद सदस्य असलेल्या १३ महिलांचा समावेश असलेल्या या समितीने शासनाला २००४ मध्ये ४० पानी अहवाल सादर केला आहे. त्या अहवालानुसार आश्रम शाळांमध्ये अंमलबजावणी झाली असती तर आश्रम शाळांमधील विद्यार्थिनींच्या अत्याचाराचे प्रकरण थांबले असते, असे मत आमदार गोऱ्हे यांनी यावेळी व्यक्त केले. दरम्यान आश्रम शाळांमधील विद्यार्थिनींवरील वाढलेले अत्याचार पाहता शासनाने सर्वच जिल्ह्यांमध्ये महिला पदाधिकाऱ्यांची दक्षता समिती नेमावी आणि या दक्षता समितीने आश्रम शाळेमध्ये विद्यार्थिनी सुरक्षित आहेत किंवा नाही यासंदर्भात तपासण्या कराव्यात अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. पाळा येथील आश्रम शाळेतील प्रकरणात नेमण्यात आलेले विशेष तपासणी पथक योग्यरितीने तपास करीत आहे. सर्व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठीही शिवसेना प्रयत्नशिल राहील, असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले. पाळा येथील प्रकरणासाठी खामगाव येथे पास्को न्यायालय निर्माण करण्याबाबत पोलिसांकडून प्रस्ताव दिल्या जाणार असल्याचे आमदार गोऱ्हे यांनी सांगितले. पत्रपरिषदेला आमदार संजय रायमुलकर, आमदार शशिकांत खेडेकर, जिल्हाप्रमुख दत्ता पाटील व जालिंधर बुधवंत आदी उपस्थित होते.आता राकाँ नेते तुरुंगात स्थिर झालेआदिवासी विभागामध्ये गैरप्रकार वाढले असून पाळा आश्रम शाळेसारख्या घटनाही घडत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यासंदर्भात आमदार गोऱ्हे यांना प्रश्न केला असता स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी काहीठिकाणी राष्ट्रवादी भाजपसोबत आहेत. त्यामुळे केवळ आदिवासींच्या समाधानासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी असा आरोप केला असेल, असा टोला आमदार गोऱ्हे यांनी लगावला. राज्यात भाजपचे स्थिर सरकार रहावे यासाठी सर्वप्रथम राष्ट्रवादीच समोर आली होती. याबाबत त्यांना विचारले असता त्यामुळेच आता राष्ट्रवादीचे नेते तुरुंगात स्थिर झाल्याचे त्यांनी मिश्कीलपणे सांगितले.