शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

सर्व संघांना दूध दरवाढ लागू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 00:51 IST

राजू शेट्टी : मुंबईतील बैठकीत मुख्यमंत्र्यांकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कजयसिंगपूर : राज्य सरकारने दुधाची दरवाढ लागू केलेली दरवाढ फक्त कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील दूध संघच देत आहेत. इतर जिल्ह्यातील दूध संघ दरवाढ देण्यास टाळाटाळ करत असून, ही दरवाढ राज्यातील सगळ्याच दूध संघांना लागू करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, खासदार राजू शेट्टी यांनी केली. शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील दूध संघाच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सोमवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत खासदार शेट्टी यांनी ही मागणी केली. राज्यातील ३० दूध संघांचे प्रतिनिधी उपस्थित होते. खासदार शेट्टी म्हणाले, शेतकरी आंदोलनानंतर सरकारने राज्यात दुधाला तीन रुपये प्रतिलिटर दरवाढ केली. सरकारचा हा आदेश सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील दूध संघांनी मानलेला आहे. मात्र सातारासह बहुतांश जिल्ह्यांत दुधाच्या दरात कोणतीही वाढ केलेली नाही. दुधाच्या पॅकिंगचा तसेच इतर खर्चात वाढ झाल्याचे कारण सांगून दुधाची दरवाढ करण्यास टाळाटाळ केली जात आहे. याचा फटका राज्यातील दूध उत्पादकांना बसत आहे. ही दरवाढ राज्यातील सर्वच दूध उत्पादक संघांना लागू करण्यात यावी. केंद्र सरकारकडे दूध पावडरला निर्यात अनुदान म्हणून १० टक्के देण्याची मागणी केली आहे. त्यासाठी राज्य सरकारने त्वरीत पाठपुरावा करावा. राज्यात एकूण दुधापैकी १० टक्के दूध हे भेसळयुक्त असून यावर आळा घालण्याची गरज असल्याची खासदार शेट्टी यांनी मागणी केली. यावेळी अनेक दूध संघांनी दूध व्यवसायासंदर्भात येत असलेल्या अडचणी मांडल्या. यावेळी आमदार अमल महाडिक, महानंदा दूध संघाचे माजी अध्यक्ष विनायकदादा पाटील, गोकुळ दूध संघाचे व्यवस्थापक डी. बी. घाणेकर, गिरीष चितळे, सोनाई दूधचे मोहन माने, विविध दूध संघांचे अध्यक्ष, खासगी दूध संघांचे मालक उपस्थित होते.मुख्यमंत्र्यांचे आश्वासनमंत्री महादेव जानकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करून सर्व उपाययोजनांचा प्रस्ताव सादर करेल. त्यावर या उपाययोजना अमलात आणल्या जातील. राज्यातील सर्वच दूध संघ एकाच ब्रँण्डखाली यावेत. जेणेकरून दुधाचा व्यवसाय सुरळीत पार पडेल. राज्यात दुधाचे मोठे मार्केट आहे. ते इतर राज्यांनी बळकावण्याऐवजी एकच ब्रॅण्ड करून दूध संघांनी एकत्रित येणे गरजेचे आहे. दूध व्यवसायासाठी चढ-उतार निधीची तरतूद करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे खासदार शेट्टी यांनी सांगितले.