लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी जुलै २०१७मध्ये आयोजित केलेल्या पुनर्परीक्षेसाठी कनिष्ठ महाविद्यालयांकडून ५ ते १४ जून दरम्यान आॅनलाइन अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्याचबरोबर विलंब शुल्क भरून १९ जूनपर्यंत अर्ज भरता येतील, असे कळविण्यात आले आहे.बारावीसाठी फेरपरीक्षेसाठी नियमित, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांची सप्टेंबर-आॅक्टोबर २०१७ऐवजी जुलै २०१७ मध्ये फेरपरीक्षा होणार आहे. अर्ज आॅनलाइन पद्धतीने भरावयाचे आहेत.
बारावी पुनर्परीक्षेसाठी १९ जूनपर्यंत अर्ज स्वीकारणार
By admin | Updated: June 2, 2017 03:25 IST