शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
4
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
5
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
6
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
7
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
8
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
9
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
10
मुत्सद्देगिरी आणि सैन्यदलांचं निर्विवाद यश!
11
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
12
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
13
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
14
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
15
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
16
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
17
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
18
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
19
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 
20
उद्धव ठाकरे ‘धनुष्यबाणा’साठी पुन्हा सक्रिय; याचिकेवर सुनावणी घेण्याची मागणी

अॅट्रॉसिटी वगळण्याबाबत अर्ज

By admin | Updated: November 30, 2014 01:21 IST

प्रतिबंधक कायद्याचे (अॅट्रॉसिटी) कलम वगळावे, असा अर्ज तपास अधिकारी सुनील पाटील यांनी शनिवारी पाथर्डी न्यायालयात सादर केला आहे.

पाथर्डी (जि. अहमदनगर) : संपूर्ण राज्यभर गाजत असलेल्या जवखेडे खालसा येथील दलित समाजातील तिघांच्या हत्या प्रकरणात लावण्यात आलेले अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे (अॅट्रॉसिटी) कलम वगळावे, असा अर्ज तपास अधिकारी सुनील पाटील यांनी शनिवारी पाथर्डी न्यायालयात सादर केला आहे. त्यामुळे हत्याकांडाच्या तपासाला गती येईल, अशी शक्यता व्यक्त झाली आहे. पोलिसांनी या घटनेत अॅट्रॉसिटीचे कलम लावले कसे? याबाबत अनेक दिवसांपासून जाहिरपणो नाराजी व्यक्त केली जात होती. 
जवखेडे खालसा येथील वस्तीवर  2क् ऑक्टोबरच्या रात्री दलित कुटुंबातील तिघांची हत्या करून त्यांचे मृतदेह विहिरीत, बोअरवेलमध्ये टाकण्यात आले होते. ही घटना 21 ऑक्टोबरला दुपारी उघडकीस आली होती. या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले होते. सर्वच राजकीय पक्षांचे जबाबदार नेते मंडळींनी जवखेडे खालसा येथे भेट देऊन या घटनेचा निषेध केला होता. तसेच आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली होती. ही घटना घडून सव्वा महिना झाला तरी अद्याप पोलीस आरोपीर्पयत पोहचले नाहीत. पोलिसांनी आतापयर्ंत गावातील सुमारे दीडशे व्यक्तींची चौकशी केली. परंतु त्यातूनही काही निष्पन्न झाले नाही. या घटनेच्या तपासासाठी पोलिसांवर मोठय़ा प्रमाणावर दबाव आहे. परंतु ठोस पुरावा पोलिसांना मिळला नाही.
या घटनेत पोलिसांनी अॅट्रॉसिटीचे कलम लावले होते. त्या कलमावरून बरेच रणकंदन झाले होते. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणात आरोपी पकडले नाहीत तर अॅट्रॉसिटीचे कलम पोलिसांनी कसे लावले? याविषयी शंका उपस्थित केली होती. तसेच भेट देणा:या अनेकांनी सदर कलम लावण्याची गरज नव्हती, असे मत व्यक्त केले होते. या गुन्ह्याचे तपासी अधिकारी सुनील पाटील यांनी शनिवारी न्यायालयात या प्रकरणात अॅट्रॉसिटीचे लावलेले कलम वगळण्यात यावे, असा अर्ज सादर केला आहे. (प्रतिनिधी)