शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

अधिवेशनात सहभागाचा कदम यांचा अर्ज फेटाळला

By admin | Updated: March 28, 2017 03:35 IST

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील ३८५ कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी आणि राष्ट्रवादी

मुंबई : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील ३८५ कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम यांचे विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात कामकाजात सहभागी होण्याचे स्वप्न भंगले आहे. विधानसभेत उपस्थित राहण्यासाठी आपल्याला तात्पुरता जामीन मिळावा, असा त्यांनी केलेला अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने आज फेटाळला. अधिवेशनात सहभागी होण्यासंदर्भात कदम यांनी केलेल्या अर्जावर न्या.ए.एस.गडकरी यांच्या समोर सुनावणी झाली. ‘अधिवेशनात जाणे हा कदम यांचा मुलभूत अधिकार आहे आणि तो त्यांना घटनेने दिलेला आहे. त्यांना अधिवेशनात सहभागी होऊ न दिल्यास ते घटनेच्या मूलभूत तत्वाचे उल्लंघन ठरेल, असा युक्तिवाद त्यांच्या वकिलांनी केला. सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी, कदम यांना कायदेशीर मार्गानेच कोठडी देण्यात आलेली आहे. त्यामुळे सभागृहात उपस्थित राहणे हा आमदार म्हणून मुलभूत अधिकार असल्याचा त्यांचा दावा स्वीकारता येणार नाही. त्यांना तात्पुरता जामीन देणे कायद्याला धरून नाही, असा युक्तिवाद केला. सर्वोच्च न्यायालयाने या आधी अन्य प्रकरणात दिलेल्या निर्णयाचे दोन दाखले आणि सुरेश कलमाडी प्रकरणी उच्च न्यायालयाच्या आदेशाचा दाखला अ‍ॅड.चव्हाण यांनी यावेळी दिला. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्या.गडकरी यांनी कदम यांचा अधिवेशनात सहभागी होण्यासाठी तात्पुरता जामीन मिळण्यासंबंधीचा अर्ज फेटाळला. (विशेष प्रतिनिधी)