शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

साध्वी प्रज्ञासिंगच्या जामिनाविरुद्ध अर्ज

By admin | Updated: June 19, 2016 03:00 IST

मालेगाव २००८ बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर हिच्या जामीन अर्जाच्या सुनावणीने वेगळे वळण घेतले आहे. साध्वीच्या जामीन अर्जाला विरोध व समर्थन करणारे मध्यस्थी

मुंबई : मालेगाव २००८ बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर हिच्या जामीन अर्जाच्या सुनावणीने वेगळे वळण घेतले आहे. साध्वीच्या जामीन अर्जाला विरोध व समर्थन करणारे मध्यस्थी अर्ज विशेष न्यायालयात दाखल करण्यात आले आहेत. शुक्रवारी विशेष एनआयए न्यायालयाने तिच्या जामीन अर्जाला विरोध करणाऱ्या अर्जाला परवानगी दिली असली, तरी तिच्या जामीन अर्जाचे समर्थन करणाऱ्या अर्जावरील निर्णय राखून ठेवला आहे. मालेगाव २००८ बॉम्बस्फोटाप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने साध्वीसह अन्य तिघांविरुद्ध ठोस पुरावे नसल्याने त्यांचे नाव आरोपपत्रातून वगळले, तसेच सर्व आरोपींवरील मोक्का हटवला. त्यामुळे साध्वीने विशेष न्यायालयात जामीन अर्ज केला. मात्र, तिच्या जामीन अर्जाला विरोध करणारा मध्यस्थी अर्ज बॉम्बस्फोटातील एका पीडिताने दाखल केला, तर तिची जामिनावर सुटका करण्यात यावी, यासाठी दीपक पारेख यांनीही मध्यस्थी अर्ज दाखल केला आहे. निसार बिलाल यांनी एनआयएने दाखल केलेले आरोपपत्र रद्द करण्यात यावे. त्याचबरोबर, दहशतवाद प्रतिबंधक पथकाला (एटीएस) प्रतिवादी करावे, अशी मागणी बिलाल यांनी मध्यस्थी अर्जात केली आहे. शुक्रवारच्या सुनावणीत विशेष न्यायालयाने बिलाल यांना मध्यस्थी करण्याची परवानगी दिली. मात्र, एटीएसला प्रतिवादी करण्याच्या मागणी फेटाळली.देवांग पारीख नावाच्या व्यक्तीनेही साध्वी प्रज्ञासिंगच्या जामीन अर्जात मध्यस्थी अर्ज केली आहे. पारीख यांनी आपण साधक असल्याचे अर्जात म्हटले आहे. ‘मालेगाव २००६ च्या आरोपींना एनआयने क्लीनचिट दिल्यानंतर, त्यांना जामीन मिळाला. त्यांच्या जामीन अर्जाला कोणीही विरोध केला नाही, परंतु साध्वीच्या जामीन अर्जाला विरोध करण्यात येत आहे. तिचे नाव आरोपपत्रातून वगळूनही तिला कारागृहात ठेवण्यात आले आहे. सरकार तिच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन करत आहे,’ असा युक्तिवाद पारीख यांच्या वतीने अ‍ॅड. सुभाष झा यांनी विशेष न्यायालयापुढे केला. (प्रतिनिधी)- विशेष न्यायालयाने पारीख यांच्या अर्जावर सरकारला सोमवारपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. सप्टेंबर २००८ मध्ये मालेगावातील एका मशिदीजवळ बॉम्बस्फोट करण्यात आला. या बॉम्बस्फोटात ३७ जण मृत्युमुखी पडले होते.