शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

‘सुगम्य’ची जाहीरात करता, सुविधांसाठी पैसे नाहीत

By admin | Updated: April 20, 2017 19:58 IST

दिव्यांगांच्या सक्षमिकरणासाठी जाहीर करण्यात आलेल्या सुगम्य भारत अभियानाच्या जाहीरातीवर कोट्यवधी रुपये खर्च करता

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 20 - दिव्यांगांच्या सक्षमिकरणासाठी जाहीर करण्यात आलेल्या सुगम्य भारत अभियानाच्या जाहीरातीवर कोट्यवधी रुपये खर्च करता, पण दिव्यांगांना प्रत्यक्ष सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तुमच्याकडे पैसे का नाहीत असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी केंद्र शासनाला विचारून शासनाच्या उदासीन भूमिकेवर नाराजी व्यक्त केली.
 
केंद्र व राज्य शासनाची विविध कार्यालये असलेल्या इमारतींमध्ये दिव्यांगांना रॅम्प, लिफ्ट, स्वच्छतागृहे, राखीव पार्किंग इत्यादी सुविधा उपलब्ध होण्यासाठी इंद्रधनू या सामाजिक संस्थेने जनहित याचिका दाखल केली आहे. याप्रकरणात पोस्ट मास्टर जनरल यांनी प्रतिज्ञापत्र सादर करून शहरातील टपाल विभागाच्या ७ इमारतींमध्ये दिव्यांगांना पोर्टेबल रॅम्प व हॅन्ड रेल उपलब्ध करून देण्यासाठी ३ लाख ८ हजार रुपये खर्च येणार असून हा निधी मंजूर झाल्यानंतर ४ महिन्यांमध्ये या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील अशी माहिती न्यायालयाला दिली. केवळ ३ लाख ८ हजार रुपये खर्चासाठी केंद्र शासन मागेपुढे पहात असल्याची बाब लक्षात घेता न्यायालय संतप्त झाले. न्यायालयाने केंद्र शासनाला फटकारून टपाल कार्यालयांच्या इमारतींमध्ये दिव्यांगांना संबंधित सुविधा कधीपर्यंत उपलब्ध करून देणार यावर २७ एप्रिल रोजी ठोस उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व अतुल चांदुरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. अनुप गिल्डा, केंद्र शासनातर्फे अ‍ॅड. अंबरीश जोशी तर, महानगरपालिकेतर्फे अ‍ॅड. जेमिनी कासट यांनी बाजू मांडली.
 
ही दुसरी जनहित याचिका-
संस्थेने समान मुद्यावर दाखल केलेली ही दुसरी जनहित याचिका होय. शासकीय इमारतींमध्ये दिव्यांगांना एक वर्षात नियमानुसार सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, नवीन इमारतींना नियमाधीन राहूनच परवानगी देण्यात येईल आणि  महानगरपालिकेंतर्गत येणाºया पण इतरांच्या मालकीच्या इमारतींमध्ये संबंधित सुविधा उपलब्ध करून देण्यास सांगू, अन्यथा कारवाई करू अशी ग्वाही महानगरपालिकेने दिल्यानंतर न्यायालयाने संस्थेची पहिली जनहित याचिका निकाली काढली होती. परंतु, महानगरपालिकेने ग्वाहीचे पालन केले नाही. परिणामी संस्थेने दुसºयांदा न्यायालयात धाव घेतली आहे.