शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

रणजित पाटील यांच्याविरुद्धची याचिका फेटाळली

By admin | Updated: March 6, 2017 18:57 IST

गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यावर बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याचा आरोप करणारी रिट याचिका

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 6 - गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यावर बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याचा आरोप करणारी रिट याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज फेटाळली. न्यायमूर्ती  भूषण गवई व न्यायमूर्ती इंदिरा जैन यांनी हा निर्णय दिला. या निर्णयामुळे डॉ. पाटील यांना दिलासा मिळाला आहे.मूर्तिजापूर (अकोला) येथील सामाजिक कार्यकर्ते विक्रांत काटे यांनी ही रिट याचिका दाखल केली होती. १९९१ ते २००४ या काळात वैद्यकीय अधिकारी असताना डॉ. पाटील यांनी लक्षावधी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याची तक्रार काटे यांनी २० डिसेंबर २०१४ रोजी केली होेती. या तक्रारीची दखल घेऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत प्रकरणाची चौकशी करण्यात आली होती. विभागाने चौकशीनंतर पाटील यांना  क्लीन चिट दिली. यावर काटे यांचा आक्षेप होता. चौकशी योग्य पद्धतीने झाली नाही असा आरोप त्यांनी करून डॉ. पाटील यांच्यावर कडक कारवाई करण्याची विनंती याचिकेत केली होती.न्यायालयाने ६ डिसेंबर २०१६ रोजी डॉ. पाटील व अन्य प्रतिवादींना नोटीस बजावून बाजू स्पष्ट करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर डॉ. पाटील यांनी आयकर विभागाकडे अर्ज करून १९९१ ते २००४ या काळातील स्वत:च्या मालमत्तेचे विवरण मागितले. आयकर विभागाने त्यांच्याकडे ६ वर्षांपर्यंतच्याच कागदपत्रांचे जतन केले जात असून त्यानंतरची कागदपत्रे ठेवणे त्यांना बंधनकारक नसल्याचे डॉ. पाटील यांना पत्राद्वारे कळविले. तसेच, १९९१ ते २००४ या काळातील डॉ. पाटील यांच्या मालमत्तेचे विवरण देण्यास असमर्थता दर्शविली. डॉ. पाटील यांनी या पत्रासह आवश्यक स्पष्टीकरणाचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले. न्यायालयाने त्यांचे उत्तर समाधानकारक ठरविले व यासह अन्य विविध बाबी लक्षात घेता काटे यांची याचिका फेटाळून लावली.