शहरं
Join us  
Trending Stories
1
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
2
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
3
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
4
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
5
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
6
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
7
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
8
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
9
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
10
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
11
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
12
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
13
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
14
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
15
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
16
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
17
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
18
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
19
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
20
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी

जॉली एलएलबी-2 चित्रपटाविरुद्ध औरंगाबाद खंडपीठात याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2017 20:43 IST

जॉली एलएलबी-2 या चित्रपटात वकिली व्यवसायाची आणि न्यायालयीन प्रक्रियेची चेष्टा केल्याचा आरोप करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे.

ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 19  -  जॉली एलएलबी-2 या चित्रपटात वकिली व्यवसायाची आणि न्यायालयीन प्रक्रियेची चेष्टा केल्याचा आरोप करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात  दाखल करण्यात आली आहे. चित्रपटातील अवमानकारक शब्द वगळावे आणि जाहिर माफी मागावी, अशी मागणी याचिकेत केली आहे. याचिकेवर 24 जानेवारी 2017 रोजी प्राथमिक सुनावणी होणार आहे. 
अक्षयकुमारच्या जॉली एलएलबी- 2 या चित्रपटाच्या विरोधात अ‍ॅड. अजयकुमार वाघमारे यांच्यावतीने अ‍ॅड. पंडीतराव आनेराव यांनी याचिका दाखल केली आहे. याचिकेत म्हटल्यानुसार या आक्षेपार्ह चित्रीकरणामुळे न्यायालयीन प्रक्रियेचा अवमान झाला आहे. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये वकील न्यायालयात पत्ते खेळतात, न्यायमुर्तींच्या आसनासमोर धावून जातात, न्यायमूर्तींसमोर मारामारी आणि बिभत्स नृत्यही करतात. चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे, असे लिहून निर्माता व दिग्दर्शकांनी न्यायव्यवस्थेची आणि वकीली व्यावसायाची चेष्टा केली असल्याचा आरोप याचिकेत केला आहे. 
याचिकेत केंद्र शासन, केंद्र शासनाच्या माहिती व प्रसासण विभागाचे सचिव, केंद्रीय विधी व न्याय सचिव, सेन्सार बोर्डाचे चेअरमन, फॉक्स स्टार इंडीया स्टुडिओचे निर्माते, चित्रपटाचे निर्माते, निर्देशक व लेखक सुभाष कपुर, कलाकार राजु भाटीया उर्फ अक्षयकुमार, अन्नुकपूर, राज्य शासनाच्या सांस्कृतीक संचालनालयाचे सचिव, विधी व न्याय विभाग यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. याचिकेवर 24 जानेवारी रोजी सुनावणी होणार असल्याची माहिती  अ‍ॅड. अजयकुमार वाघमारे यांनी दिली.