शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

‘दशक्रिया’विरोधातील याचिका फेटाळली, चित्रपट राज्यभर प्रदर्शित; ब्राह्मण महासंघाची ठिकठिकाणी निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 02:30 IST

‘दशक्रिया’ चित्रपट प्रदर्शनाला बंदी घालण्याची विनंती करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. मंगेश पाटील यांनी शुक्रवारी फेटाळली.

औरंगाबाद/कोल्हापूर/नाशिक/पुणे : ‘दशक्रिया’ चित्रपट प्रदर्शनाला बंदी घालण्याची विनंती करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. मंगेश पाटील यांनी शुक्रवारी फेटाळली. राज्यात ब्राह्मण महासंघांनी चित्रपटाला विरोध करत आंदोलन केले, मात्र पोलीस बंदोबस्तात चित्रपट राज्यभर प्रदर्शित झाला.सर्जनशील व्यक्तीला नाटक, चित्रपट आदींच्या माध्यमातून कायद्याच्या कक्षेत अभिव्यक्तिस्वातंत्र्य मिळायला हवे, असे सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांच्यावरील लघुपटाच्या बंदीविरोधातील याचिकेवरील निर्णयात म्हटल्याचा संदर्भ देत, न्यायालयाने उपरोक्त निर्णय दिला. बोलणे आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्य हे अटळ आहे. चित्रपट, नाटक, पुस्तक, लघुपट यावर बंदीच्या आदेशापूर्वी न्यायालयाने त्याबाबत साक्षेप बाळगावा. ज्यामुळे लेखक, कलाकार, निर्माते अभिव्यक्तिस्वातंत्र्य जपू शकतील, असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात म्हटल्याचा आधार घेत खंडपीठाने ही याचिका फेटाळली.‘दशक्रिया’ चित्रपटातील अनेक संवाद, उल्लेख हे मानहानिकारक, भावना दुखावणारे, संदर्भहीन असल्याचा आक्षेप घेणारी आणि चित्रपट प्रदर्शनाला बंदी घालण्याची विनंती करणारी पैठण येथील पुरोहित समीर शुक्ल, सोहम पोहेकर, समीर धर्माधिकारी आदींची याचिका शुक्रवारी सुनावणीस आली होती.मराठा महासंघाच्या पुढाकाराने प्रदर्शनकोल्हापुरला अखिल भारतीय मराठा महासंघाने चित्रपटगृहांच्या व्यवस्थापनाची भेट घेऊन चित्रपटाचे खेळ सुरू करायला लावले. चित्रपटाकडे प्रबोधनाचे माध्यम म्हणून बघावे, अशी भूमिका महासंघाने मांडली.पुणे, नाशिकमध्ये आंदोलनपुणे, नाशिकमध्ये ब्राह्मण महासंघांनी चित्रपटाला विरोध केला. ब्राम्हण समाजाने हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले होते.पैठणमध्ये दशक्रिया विधीत अडथळे -पैठणमध्ये शुक्रवारी मोक्षघाटावर विधी करण्यासाठी पुरोहित हजर राहिले नव्हते. चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याच्या मागणीसाठी ब्राह्मण समाजातर्फे शुक्रवारी निदर्शने करण्यात आली. दुपारी १२ नंतर विधी सुरू झाले. राज्यभर या चित्रपटाला विरोध झाला तरी काही ठिकाणी चित्रपट सुरळीत सुरू झाला़ तसेच चित्रपट परीक्षकांनी दर्जेदार सिनेमा असे कौतुक केले आहे़