शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

अत्रे कट्ट्याच्या उपक्रमाचा अ‍ॅप हवा

By admin | Updated: May 17, 2016 03:54 IST

तरुण पिढीकडे पोहोचायचे असल्यास त्यांच्या खिशातील मोबाइलकडे वळणे गरजेचे आहे.

ठाणे : तरुण पिढीकडे पोहोचायचे असल्यास त्यांच्या खिशातील मोबाइलकडे वळणे गरजेचे आहे. म्हणजेच, त्यांच्या खिशातून हृदयाकडे जाण्याचा मार्ग सोपा होतो. अत्रे कट्ट्यासारख्या उपक्रमात त्यांना सहभागी करून घेण्यासाठी अ‍ॅपची निर्मिती करा, असा सल्ला डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू संजय ओक यांनी दिला. रविवारी गडकरी रंगायतन येथे अत्रे कट्ट्याचा १५ वा वर्धापन दिन साजरा झाला. या वेळी बोलताना ओक यांनी सांगितले की, आजची तरुण पिढी लिहू शकत नाही; पण टेक्सटिंग करते. बोलू शकत नाही, पण ब्लॉकिंग करते. त्यामुळे अ‍ॅपची निर्मिती केल्यास त्यांचा सहभाग वाढण्यास मदत होईल.अत्रे कट्ट्याने चालू केलेला उपक्रम कौतुकास्पद आहे. तसेच आता स्वत:चे हक्काचे सभागृह घ्यावे, म्हणजे असे अनेक चांगले कार्यक्रम त्यांना करता येतील आणि रसिक ठाणेकरांना त्या कार्यक्रमाचा आनंद घेता येईल, असे सांगून आ. प्रताप सरनाईक यांनी त्यांना मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन केले. व्यासपीठावर आ. प्रताप सरनाईक, संपदा वागळे, विदुला ठुसे, शीला वागळे, अनंत मराठे आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी अनुजा वर्तक यांचा ‘हृदयी प्रीत जागते’ हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात निलेश निरगुडकर यांनी ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ या गाण्याने केली. त्यानंतर, कार्यक्रमाचे शीर्षक गीत ‘हृदयी प्रीत जागते, जाणता न जाणता’, हे गाणे सादर करताच रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. आचार्य अत्रे यांना ‘संगीत संशयकल्लोळ’ हे नाटक आवडायचे. विशेष म्हणजे याच नाटकातील ‘मजवरी तयाचे प्रेम खरे’ हे पद त्यांना अधिक आवडे, अशी निवेदिका दीपाली केळकर यांनी त्यांची आठवण सांगितली. त्यानंतर, कश्मिरा राईलकर यांनी आपल्या सुंदर आवाजातून हे पद सादर केले. सासू आणि सुनेचे नाते आता बदलले असल्याचे निवेदिका केळकर यांनी नमूद करताच गायिका वर्तक यांनी ‘मुली तू आलीस आपल्या घरी’ हे गाणे सादर केले. गायिका राईलकर आणि गायक निरगुडकर यांनी ‘धुंदीत राहू मस्तीत गाऊ’ हे गाणे सादर केले. त्यानंतर ‘भरजरी गं पितांबर दिला आणून द्रौपदीस बंधू शोभे नारायण’, ‘तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांचा माळा’, ‘काय सांगू शेणी बाई माझा माहेरचा थाट’, ‘राधा कृष्णावर भाळली’, ‘ऐन दुपारी यमुनातीरी’ अशी अनेक गाणी सादर करण्यात आली. मयूरेश शेर्लेकरच्या ढोलकीवादनाने कार्यक्रमाची रंगत वाढली.