शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅप आधारित टॅक्सी आवश्यक

By admin | Updated: July 1, 2017 03:14 IST

ओला, उबरसारख्या अ‍ॅप आधारित टॅक्सी सामान्यांसाठी आवश्यक आहेत. या टॅक्सींचे भाडे निश्चित करण्यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यापूर्वी

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ओला, उबरसारख्या अ‍ॅप आधारित टॅक्सी सामान्यांसाठी आवश्यक आहेत. या टॅक्सींचे भाडे निश्चित करण्यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यापूर्वी राज्य सरकारने जनहित लक्षात घ्यावे, असे उच्च न्यायालयाने शुक्रवारी अ‍ॅप आधारित टॅक्सी चालकांनी व उबरने केलेल्या याचिकेवरील सुनावणीत म्हटले. दरम्यान, दरनिश्चिती समितीने अहवाल सादर केल्याशिवाय ओला, उबरच्या टॅक्सींवर कारवाई न करण्याचे आश्वासन राज्य सरकारने उच्च न्यायालयाला दिले.महाराष्ट्र सिटी टॅक्सी योजनेविरुद्ध उबर व सहा चालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. या याचिकेवरील सुनावणी न्या. आर. एम. सावंत व न्या. साधना जाधव यांच्या खंडपीठापुढे होती.शुक्रवारच्या सुनावणीत सरकारी वकील जे. डब्ल्यू. मॅट्टोस यांनी काळ्या-पिवळ्या टॅक्सींसह अ‍ॅप आधारित टॅक्सींचे भाडे निश्चित करण्यासाठी दरनिश्चिती समिती नेमण्यात आल्याची माहिती न्यायालयाला दिली. ‘समितीचा अहवाल प्रतीक्षेत आहे. अहवाल मिळेपर्यंत कोणतीही कठोर कारवाई करणार नाही,’ असे मॅट्टोस यांनी न्यायालयाला सांगितले.उबरचे जाळे संपूर्ण जगभरात पसरले असून त्यांची सेवा चांगली आहे. ग्राहकांचे हित पाहता हा विषय गंभीर आहे. कोणताही अंतिम निर्णय घेण्यापूर्वी राज्य सरकारने विचार करावा. ओला, उबरसारख्या अ‍ॅप आधारित टॅक्सी सामान्यांसाठी आवश्यक आहेत. त्यामुळे या टॅक्सींना बंदी घालू नका. तसे केलेत तर स्पर्धा थांबेल आणि पुन्हा काळ्या-पिवळ्यांच्या जमान्यात जाऊ, असे न्यायालयाने म्हटले.आम्हालाही ग्राहकांची आणि त्यांच्या हिताची चिंता आहे. सर्व ग्राहक, जे करदाते आहेत त्यांच्यावरही याचा परिणाम होईल. आम्हाला सांगा किती काळ्या-पिवळ्या टॅक्सी कमी अंतरावर जाण्यास तयार होतील? त्या सर्वांना दूरचे भाडे हवे असते, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने याचिकाकर्त्यांना आॅल इंडिया रेडिओ टॅक्सी आॅपरेटर्स असोसिएशनला प्रतिवादी करण्याचे निर्देश दिले. उच्च न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी ३ आॅगस्ट रोजी ठेवत राज्य सरकारलाही प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले.