शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

‘एपीएमसी’त दोन गाळ्यांना आग

By admin | Updated: April 3, 2017 05:37 IST

एपीएमसी मसाला मार्केटमधील दोन बंद गाळ्यांना रविवारी दुपारी आग लागली

नवी मुंबई : एपीएमसी मसाला मार्केटमधील दोन बंद गाळ्यांना रविवारी दुपारी आग लागली. या आगीमध्ये त्या ठिकाणचा मसाल्याचा साठा जळून खाक झाल्याने, व्यापाऱ्याचे सुमारे एक कोटींचे नुकसान झाले आहे. याच वेळी आग विझवण्याच्या प्रयत्नात अग्निशमन दलाची गाडी उलटून दोघे कर्मचारी जखमी झाले आहेत. मसाला मार्केटमधील बी विंगच्या ३३ व ३४ क्रमांकाच्या गाळ्यांना दुपारी १ वाजण्याच्या सुमारास आग लागली. विजेच्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोन्ही गाळ्यांमध्ये दगडफूल, तेजपत्ता अशा मसाला पदार्थांसह आयुर्वेदिक वनौषधींचा साठा होता. त्यामुळे आगीत हे पदार्थ पेटल्याने मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता. आग मोठी असल्यामुळे ती आटोक्यात आणण्यासाठी अधिक प्रमाणात पाण्याचा मारा करावा लागत होता. याकरिता पहिल्या टँकरचे (वॉटर बाउझर) पाणी संपल्याने, दुसरे वाहन मागवले होते. दुसरा वॉटर बाउझर पाणी घेऊन वेगात घटनास्थळाकडे येत असताना, मसाला मार्केटच्या प्रवेशद्वारावर वळण घेताना तो उलटला. यामध्ये टँकरचालक परमेश्वर अरेनवुरू व फायरमन संतोष जाधव हे दोघे जखमी झाले. त्यांना वाशीतील पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गाळ्याच्या मागच्या बाजूची भिंत फोडून मसाला बाहेर काढला. अखेर अग्निशमन दलाच्या प्रयत्नांनंतर पाच तासांनी आग नियंत्रणात आली. (प्रतिनिधी)