शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

एपीएमसीत पेट्रोल पंपाची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2016 03:06 IST

किरकोळ कारणावरून पेट्रोल पंपाच्या मॅनेजरला मारहाण करून तोडफोड करणाऱ्यांना एपीएमसी पोलिसांनी अवघ्या काही तासांत अटक केली

 नवी मुंबई : किरकोळ कारणावरून पेट्रोल पंपाच्या मॅनेजरला मारहाण करून तोडफोड करणाऱ्यांना एपीएमसी पोलिसांनी अवघ्या काही तासांत अटक केली आहे. अटक केलेले पाचही तरुण तुर्भे गावचे राहणारे आहेत. गुरुवारी रात्री त्याठिकाणी हा प्रकार घडला होता. एपीएमसी येथील इंडियन आॅइल पेट्रोल पंपाच्या ठिकाणी गुरुवारी रात्री हा प्रकार घडला. तुर्भे गावातील दोघे तरुण दुचाकीवरून त्याठिकाणी पेट्रोल भरण्यासाठी आले होते. यावेळी पेट्रोल भरल्यानंतर पैसे देण्यावरून त्यांचा पेट्रोल पंपावरील कामगारासोबत वाद झाला होता. परंतु त्याठिकाणी उपस्थित मॅनेजरने प्रकरण मिटवून तरुणांना परत पाठवले होते. मात्र काही वेळाने ते दोघे त्यांच्या इतर सहकाऱ्यांना घेवून पेट्रोल पंपाच्या ठिकाणी आले. त्यांनी मॅनेजरच्या केबिनवर दगडफेक करत मारहाण करून पळ काढला होता. या प्रकाराची माहिती मिळताच एपीएमसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रथम हा प्रकार दरोड्याच्या प्रयत्नातून झाल्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यानुसार एपीएमसी पोलिसांनी शीघ्र गतीने तपासाला सुरवात करून अवघ्या दोन तासांत तुर्भे गावातून पाच जणांना अटक केली. चौकशीत त्यांनी पेट्रोल भरण्यावरून झालेल्या वादात त्याठिकाणी तोडफोड केल्याचे स्पष्ट झाले. अशोक सवादकर (१९), गणेश राजपुरे (१९), मनोज नावडकर (२३), स्वप्निल जाधव (२३) व भूषण बामणे (२१) अशी त्यांची नावे आहेत. बामणे हा कोपरखैरणेचा तर इतर सर्व जण तुर्भे गावातील राहणारे आहेत. (प्रतिनिधी)