शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची मुस्लीम धर्मगुरू, इमाम यांच्यासोबत महत्त्वाची बैठक
2
दौंड गोळीबार: आमदार शंकर मांडेकर यांच्या भावासह तिघांना अटक; प्रकरण अखेर बाहेर आलेच...
3
भारताचे तसे शेजारीच: आशियातील दोन देश सीमेवर भिडले; सैन्यामध्ये गोळीबार, युद्धपूर्व तणाव...
4
सेल्फी काढायला बोलावलं, गाडीत ओढून चौघांनी मारहाण केली; हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचं अपहरण
5
अखेरचा श्वास सोबत घेतला, मैत्रीचा धागा तुटला; नाशिकात एकाचवेळी निघाली २ मित्रांची अंत्ययात्रा
6
सावधान! सिगारेटपेक्षाही जास्त हानिकारक असू शकतो अगरबत्तीचा धूर; कॅन्सरचाही मोठा धोका
7
राज्य सरकारकडून बिल वेळेत मिळालं नाही; कंत्राटदाराने उचललं टोकाचं पाऊल; विरोधकांचा हल्लाबोल
8
काय घडतेय? भारतातील गर्भश्रीमंत, बिझनेसमन महागड्या गाड्यांच्या बुकिंग धडाधड रद्द करू लागले...
9
Deep Amavasya 2025: आज दिवसभरात १० मिनिटं तरी दीपपूजन कराच; पूर्ण वर्ष प्रकाशमान होईल!
10
ब्रिटिशांसारखीच भारतावरही २१ वर्षांपूर्वी वेळ आलेली...; जेव्हा मिराज-२००० मॉरीशसमध्ये अडकलेले...
11
गजकेसरी, गुरुपुष्यामृतयोग एकाच दिवशी: ७ राशींची भरघोस भरभराट, चौफेर लाभच लाभ; शुभ वरदान काळ!
12
Stock Market Today: फ्लॅट ओपनिंगनंतर शेअर बाजार घसरला, Nifty २५,२०० च्या खाली; Tata Motors, Tata Consumer मध्ये तेजी
13
"मंदिरातून साईबाबांची मूर्ती हटवा अन्...." हिंदू सेनेच्या तलवार बाबाचे संतापजनक विधान
14
FD, SIP सर्व विसरुन जाल... Post Office कडे आहेत जबरदस्त सेव्हिंग स्कीम्स; एकदा गुंतवणूक, दरवर्षी मिळतील २.४६ लाख
15
अभिमानास्पद! इटालियन तरुणींनी गायली 'वाजले की बारा' लावणी, समोर आलं नागपूरचं कनेक्शन
16
चीनच्या 'मच्छर'नंतर आता 'झुरळ' बनणार युद्धभूमीतलं नवं शस्त्र; 'या' देशानं बनवला खतरनाक प्लॅन
17
श्रीराम-भरत मिलाप! रामायणातील महत्वाची घटना; सिनेमाबद्दल आदिनाथ कोठारे म्हणतो...
18
आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील
19
विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसचा दावा; उद्धवसेनेकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता
20
शिक्षिकेसोबत मुलाचे शारीरिक संबंध आहेत हे आई-वडिलांना माहिती होतं; लेडी टीचरला मिळाला जामीन

मंत्र्यांच्या मान्यतेशिवाय २६ कामे घुसवली

By admin | Updated: May 26, 2017 03:55 IST

अल्पसंख्याक विकास विभागाचे मंत्री विनोद तावडे यांच्या मान्यतेशिवाय तब्बल २६ कामे घुसविण्यात आल्याच्या प्रकरणाची या विभागात सध्या जोरदार चर्चा आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अल्पसंख्याक विकास विभागाचे मंत्री विनोद तावडे यांच्या मान्यतेशिवाय तब्बल २६ कामे घुसविण्यात आल्याच्या प्रकरणाची या विभागात सध्या जोरदार चर्चा आहे. या प्रकरणी कक्ष अधिकाऱ्यास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असली तरी या कारस्थानाचा सूत्रधार मात्र वेगळाच आहे. अल्पसंख्याकबहुल ग्रामीण भागात मूलभूत/पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अनुदान वितरित करण्याची ही योजना आहे. त्यात काही कामांना ३१ मार्च रोजी म्हणजे आर्थिक वर्ष संपण्याच्या शेवटच्या दिवशी तावडे यांच्या मान्यतेने मंजुरी देण्यात आली. मात्र, त्यानंतर असा धक्कादायक प्रकार लक्षात आला की २६ कामे ही त्यांच्या मान्यतेशिवायच घुसविण्यात आली. तसा आदेशही निघाला. या घुसविलेल्या कामांमध्ये नाशिक, धुळे, कोल्हापूर, रायगड, बीड, भंडारा, बुलडाणा, उस्मानाबाद, जालना या जिल्ह्यांतील कामांचा समावेश होता. मंत्र्यांना अंधारात ठेवून केलेल्या या प्रकाराचे बिंग फुटले आणि मग कारवाईची सूत्रे हलली. कक्ष अधिकारी शशिकांत साळुंके यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. विश्वसनीय सूत्रांनी सांगितले की, या नोटिशीच्या उत्तरामध्ये मंत्री कार्यालयातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दबावामुळे आपण त्या कामांचा समावेश केला, असा खुलासा साळुंके यांनी केला आहे. वरिष्ठ अधिकारी म्हणजे नेमके कोण, अशी लेखी विचारणा त्यांना करण्यात आली तेव्हा त्यांनी मंत्री कार्यालयातील एका ओएसडींचे नाव घेतले. या ओएसडींची मंत्री कार्यालयात अधिकृत नियुक्तीच झालेली नसल्याची माहिती आहे. ते केंद्र सरकारमधील एका मंत्र्यांचे नातेवाईक असल्याचे सांगण्यात येते. राज्य शासनाच्या विविध योजनांमधून आपापल्या भागात कामे मंजूर करवून घेण्यासाठी काही दलाल मंत्रालयात फिरत असतात. ते अधिकाऱ्यांना हाताशी धरतात. त्यामध्ये काही आमदारांचे पीएदेखील सक्रिय असतात. या सगळ्यांच्या संगनमतातून मंत्र्यांना अंधारात ठेवून कामे मंजूर करवून घेतली जातात, असे म्हटले जाते.