शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
3
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
4
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
5
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
6
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
7
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
8
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
9
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
10
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
11
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
12
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
13
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
14
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
15
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
16
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
17
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
18
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
19
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
20
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार

नमन सादरीकरणातून पोलिसांची दहशतवादविरोधी जनजागृती

By admin | Updated: May 23, 2015 00:36 IST

वरवेली येथील नवतरुण नमन मंडळाच्या बहुरंगी--गावागावातून जनजागृती मोहीम यशस्वी

गुहागर : देशातील काही मोठ्या दहशतवादी कारवायांमध्ये अतिरिक्यांनी समुद्रामार्गे घुसखोरी करुन हाहाकार माजवला होता. हे लक्षात घेऊन कोकणची प्रमुख लोककला असलेल्या नमन नाट्यकलेतून समुद्र किनारपट्टीवरील गावांमध्ये जनजागृती करण्याचा अतिशय स्तुत्य उपक्रम गुहागर पोलिसांकडून राबवण्यात येत आहे. वरवेली येथील नवतरुण नमन मंडळाच्या बहुरंगी सादरीकरणातून गावागावातून जनजागृती मोहीम यशस्वी होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. गुहागर तालुक्याला सुमारे ४० किलोमीटर लांबीची समुद्रकिनारपट्टी लाभली आहे. त्यामुळे किनारपट्टीचे संरक्षण हे गुहागर पोलिसांपुढील मोठे आव्हान आहे. गावागावांतून दक्षता समिती सागररक्षक दलांची स्थापना करण्यात येते. मात्र, सर्वसामान्य जनतेपर्यंत आपल्या सुरक्षिततेबाबत जागृती होणे गरजेचे आहे. त्यातील जिज्ञासुवृत्तीत वाढ होऊन पोलीस नागरिकांत मित्रत्त्वाचे नाते निर्माण होणे गरजेचे आहे. त्यासाठी अतिरेकी कारवायांमध्ये होणारा सागर किनारपट्टीचा वापर याबाबत वेलदूर, आसगोली, वेळणेश्वर, पालशेत, बुदल, नरवण आणि तवसाळ या किनारपट्टीवरील प्रमुख गावांमध्ये ‘मानवी रक्षक, मानवी भक्ष्यक’ या वगनाट्याच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. कोकणी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय असल्याने नमनाला ग्रामीण जनतेची गर्दी होत आहे. गण (गणेश वंदना), गवळण, संकासूर आणि पाठोपाठ मानवी रक्षक, मानवी भक्ष्यक हे वगनाट्य सादर करण्यात येत आहे. चार दहशतवाद्यांना गावातील एकजण पैशांच्या मोहापायी आसरा देतो. वगनाट्यातून सरळ वाटणाऱ्या घटनांकडे बारकाईने पाहिले असता, आपण संभाव्य दुर्घटना वाचवू शकतो. अनोळखी व्यक्तिंना चुकीची मदत करु नका, संशयास्पद घटनांकडे गांभिर्याने पाहून पोलिसांना माहिती द्या, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले. पोलीस निरीक्षक विनीत चौधरी, उपनिरीक्षक एम. बी. यादव, महेश टेमकर, आशिष बल्लाळ यांनी हा उपक्रम यशस्वी केला. वरवेली येथील नवतरुण नमन मंडळाच्या कलाकारांचे ही संकल्पना यशस्वी करण्यात मोठे योगदान आहे. (वार्ताहर)