शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
4
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
5
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
6
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
7
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
8
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
9
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
10
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
11
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
12
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
13
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
14
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
15
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
16
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
17
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
18
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
19
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
20
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
Daily Top 2Weekly Top 5

Anti-drug day; फक्त तीस टक्के तरूण व्यसनांपासून दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 12:15 IST

अमली पदार्थविरोधी दिन : दररोजच्या जीवनात व्यसन करणाºयांचं प्रमाण ५0 टक्के

ठळक मुद्दे५0 टक्के लोक दररोज नित्यनियमाने अमली पदार्थांचे सेवन करतात२0 टक्के लोक हे आठवड्यातून व १५ दिवसांतून अल्कोहोल प्राशन करतात.व्यसनापासून बाहेर पडणे शक्य आहे, त्यासाठी कौन्सिलिंग आणि योग्य औषधोपचार देणे आवश्यक

सोलापूर : उच्चभ्रू समाजात एक फॅशन म्हणून प्राशन केलेले अल्कोहोल, धकाधकीच्या जीवनात तणावातून मुक्ती मिळविण्यासाठी उपाय म्हणून सध्या लोकांमध्ये व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढले आहे. समाजातील ७0 टक्के तरूणांमध्ये व्यसनाधिनता वाढली आहे. तसेच आयुष्यभरात कधीही कसलेही व्यसन न केलेल्या तरूणांचे प्रमाण फक्त १0 टक्के इतके आहे अशी माहिती या घटकांसोबत काम करणाºया संबंधित अधिकाºयांनी दिली. 

ज्या पदार्थांच्या सेवनाने माणसाला विशिष्ट प्रकारची सुस्ती, नशा, तार किंवा धुंदी येते, त्यांना रुढार्थाने मादक पदार्थ किंवा अमली पदार्थ म्हणतात. अफू व त्यापासून तयार केलेले मॉर्फीन, हेरॉईन इ. पदार्थ, कोकेन, भांग, गांजा, चरस (हशिश) वगैरे पदार्थांचा मादक पदार्थांत समावेश केला जातो. ब्राऊन शुगर, झंडूबाम रुमालावर टाकून त्याचा नाकाद्वारे वास घेतात, यातून त्यांना नशा येते. स्पिरीटचाही नशेसाठी अशाचप्रकारे वापर केला जात आहे. यापुढेही जाऊन श्रीमंत लोक सिंथेटीक अंमली पदार्थ आणि आता घातक जीवघेणा एमडीचा (मॅफेड्रॉन) वापर होऊ लागला आहे. शिवाय मॅजिक मश्रूम, एलसीडी, मारिजुआना, म्याव-म्याव, डॅरनेक्स, शिलावती, वेदनाशामक गोळ्या, व्हाईटनर ते औषधे यांचाही वापर नशेसाठी केला जाऊ लागला आहे. 

केवळ जिज्ञासेपोटी अमली पदार्थांची चव चाखणारे आज या गर्तेत आपोआपच सापडले जात आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबरच उच्चभ्रू वर्गातील लोकही यात गुरफटू लागले आहेत. सुरुवातीला कोणीही अमली पदार्थ व्यसनाधीन होण्यासाठी सेवन करीत नाही. काही विद्यार्थी अभ्यास करताना झोप येऊ नये म्हणून सुरुवातीला अमली पदार्थांचे सेवन करतात. मुलीही अमली पदार्थांच्या विळख्यात अडकू लागल्या आहेत. बाजारात नशा आणणारे अनेक पदार्थ मिळतात. काही औषधांनीही नशा  येते. काहीजण अमली पदार्थ शरीरात टोचून घेतात, पण कोणताही अमली पदार्थ हा शरीरासाठी घातकच आहे. 

व्यसनांची लक्षणे...- पॉकेटमनी वाढविण्यासाठी सतत पालकांकडे तगादा. घरातील वस्तू हळूहळू गायब होणे. जुने मित्र सोडून नवीन मित्र बनविणे. बाथरुममध्ये जास्त वेळ घालविणे. घरात इंजेक्शन अथवा सिरिंज आढळणे. डोळे लाल, निस्तेज होणे, डोळ्यांखाली सूज येणे. वर्तणुकीत अचानक बदल घडतो. अमली पदार्थांचे सेवन करणाºया मुलांची शाळेत उपस्थिती कमी होऊ लागते. अभ्यासात, खेळ किंवा अन्य कार्यक्रमात त्यांचे मन लागत नाही. बोलताना अडखळणे, उभे राहण्यासाठी त्रास होणे, भूक न लागणे, वजन कमी होणे, व्यक्तिगत स्वच्छता, कपड्यांबद्दल बेफिकिरीने वागणे, निद्रानाश, व्यसनाचे परिणाम फुफ्फुस, स्मरणशक्ती, अवयव निकामी होणे, अस्वस्थता, मानसिक आजार वाढतात.

समाजात तसे पाहिले तर ९0 टक्के व्यसनाधिनतेचे प्रमाण आहे. ५0 टक्के लोक दररोज नित्यनियमाने अमली पदार्थांचे सेवन करतात. २0 टक्के लोक हे आठवड्यातून व १५ दिवसांतून अल्कोहोल प्राशन करतात. व्यसनापासून बाहेर पडणे शक्य आहे, त्यासाठी कौन्सिलिंग आणि योग्य औषधोपचार देणे आवश्यक आहे. - डॉ. विलास पाटील, होमिओपॅथिक तज्ज्ञ

टॅग्स :SolapurसोलापूरDrugsअमली पदार्थDrunk And Driveड्रंक अँड ड्राइव्ह