शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

हुंडाविरोधी चळवळी मंदावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2017 07:02 IST

लग्नात हुंडा देणे आणि घेणे कायद्यानुसार गुन्हा असला, तरी तो धाब्यावर बसवला जात आहे. पूर्वी हुंडाविरोधी चळवळींनी अशा प्रकारच्या घटना समाजासमोर आणल्या

पुणे : लग्नात हुंडा देणे आणि घेणे कायद्यानुसार गुन्हा असला, तरी तो धाब्यावर बसवला जात आहे. पूर्वी हुंडाविरोधी चळवळींनी अशा प्रकारच्या घटना समाजासमोर आणल्या आणि न्याय मिळवण्यासाठी झगडाही केला. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये हुंडाविरोधी चळवळींचे प्रमाण कमी झाले आहे. त्याऐवजी समुपदेशन केंद्रे उभारण्यात आली आहेत. हुंडाविरोधी चळवळीत मुलींनीही मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आहे. वैयक्तिक जागरूकता हाच एकमेव उपाय असल्याचे मत महिला संघटना कार्यकर्त्या आणि जाणकारांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. हुंडाबळीचे दुष्परिणाम समजावून सांगण्यासाठी शाळा, कॉलेज, सामाजिक संस्था, झोपडपट्टी अशा ठिकाणी जनजागृतीचे कार्यक्रम राबवून कौटुंबिक हिंसाचार कायदा, स्त्रियांचे सामाजिक महत्त्व, कायद्याचे फायदे व तोटे, समुपदेशनाची गरज याविषयी माहिती देणे अपेक्षित आहे. पैसे, दागिने, कपडे, यांसारखी देवाणघेवाण बाजूला ठेवून मुलाची व मुलीची वैद्यकीय तपासणी करणे जास्त आवश्यक आहे, अशी अपेक्षाही या वेळी व्यक्त करण्यात आली.हुंडाविरोधी चळवळ सुरू केल्यानंतर कायद्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले. स्त्रियांबाबत वेगळ्या प्रकारचे कायदे अस्तित्वात आले. स्त्री आपल्या समस्या घेऊन कौटुंबिक न्यायालयात जाऊ शकते, तिथे तक्रार नोंदवू शकते. बऱ्याचदा पालक मुलींवर लग्नासाठी दबाव आणतात. दुसरीकडे काही समाजांत हुंडा नको; पण मुलीच्या अंगावर एवढे तोळे सोने घाला, लग्न थाटात लावून द्या, अशा छुप्या मार्गाने हुंडा घेतात. दुसरीकडे मात्र काही तरुण- तरुणींनी हुंडा न घेतादेखील लग्न केल्याची उदाहरणे आहेत; मात्र ती तुरळक आहेत, असे मत सामाजिक कार्यकर्त्या लता भिसे यांनी व्यक्त केले.हुंडा विरोधातील आमची चळवळ कधीही थांबली नाही. आज आपली पावले जागतिकीकरणाच्या दिशेने पडत आहेत. अशा परिस्थितीत सामाजिक परिवर्तनाकडे आपणा सर्वांचेच दुर्लक्ष झाले. प्रत्यक्ष जीवनात विवाहप्रसंगी मुलीकडची बाजू कनिष्ठ आणि मुलाकडची बाजू श्रेष्ठ, असेच मानले जाते. लग्नात दोन्हीकडचा खर्च; तसेच दागदागिने, भेटवस्तू, मालमत्ता, वरदक्षिणा या आणि अशा अनेक मागण्या वरपक्षाकडून अटीच्या स्वरूपात केल्या जातात.या सर्वांच्या विरोधात मुलींनी बोलले पाहिजे. तुझे मत, आवाज हे तुझे शस्त्र आहे. आणि त्या शस्त्राचा वापर करायला हवा. अत्याचाराविरोधात बोलले पाहिजे. माहेर हे मुलींचे हक्काचे घर आहे, त्यामुळे तिला तिच्या घरी येण्यास कोणीही प्रतिबंध करू शकत नाही. पालकांनी मुलींचे विचार व्यापक केले पाहिजे, असे मत स्त्री चळवळीतील कार्यकर्त्या प्रतिमा परदेशी यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)