शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाविरोधक आक्रमक

By admin | Updated: June 25, 2016 00:58 IST

स्मार्ट सिटीच्या निमंत्रण पत्रिकेतून महापौरांचे नाव वगळणे... कार्यक्रमामध्ये स्वागतपर बोलण्याची संधी न देणे... महापौरांना कार्यक्रमाचे पास दिल्यास ते समाजकंटकांपर्यंत पोहतील

पुणे : स्मार्ट सिटीच्या निमंत्रण पत्रिकेतून महापौरांचे नाव वगळणे... कार्यक्रमामध्ये स्वागतपर बोलण्याची संधी न देणे... महापौरांना कार्यक्रमाचे पास दिल्यास ते समाजकंटकांपर्यंत पोहतील असे वातावरण करून त्यांना पास न उपलब्ध करून देणे... लोहगाव विमानतळावर पंतप्रधानांचे स्वागत करण्यास महापौरांना मनाई करणे अशा प्रकारची अपमानास्पद वागणूक नगरविकास मंत्रालयाकडून महापौरांना देण्यात आली. त्यामुळे या कार्यक्रमावर बहिष्कार टाकत असल्याची घोषणा महापौर प्रशांत जगताप यांनी शुक्रवारी केली. महापौरांपाठोपाठ काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे या पक्षांनीही या कार्यक्रमावर बहिष्कार टाकणार असल्याचे स्पष्ट केले आहे.स्मार्ट सिटी योजनेची वर्षपूर्ती होत असल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्मार्ट सिटीतील १४ प्रकल्पांचा शुभारंभ करण्यात येत आहे. केंद्रीय नगरविकास मंत्रालयामार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र या कार्यक्रमाचे आयोजन करताना महापौर तसेच इतर राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेतल्यामुळे भाजपाने हा कार्यक्रम हायजॅक केल्याची टीका सर्व स्तरांतून करण्यात येत होती. या पार्र्श्वभूमीवर महापौर तसेच भाजपा वगळता सर्वच पक्षांनी स्मार्ट सिटीच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय जाहीर केला आहे. केंद्रीय नगरविकास मंत्रालयाच्या कार्यपद्धतीचा तीव्र निषेध राजकीय पक्षांनी केला आहे.प्रशांत जगताप म्हणाले, ‘‘लोहगाव विमानतळावर जाऊन ४० लाख पुणेकरांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मी स्वागत करणार आहे; मात्र स्मार्ट सिटीच्या कार्यक्रमात सहभागी होणार नाही. स्मार्ट सिटीच्या निमंत्रणपत्रिकेमध्ये महापौरांचे नाव टाकण्यात आले नाही. या कार्यक्रमाची निमंत्रणपत्रिका एका शिपायामार्फत माझ्याकडे पाठवून देण्यात आली. महापौरपदासाठी आवश्यक असणाऱ्या प्रोटोकॉलचे यामध्ये पालन करण्यात आले नाही. कार्यक्रमामध्ये स्वागतपर बोलण्याची संधीही नाकारण्यात आली. त्यामुळे या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घ्यावा लागला.’’पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काळे झेंडे दाखवून त्यांच्या विरोधात आंदोलन करणार असल्याचे काँग्रेस पक्षाने यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यानुसार कार्यक्रमाच्या ठिकाणी त्यांच्याकडून निर्दशने केली जाणार आहेत. काँग्रेस पक्षाचा एकही नगरसेवक किंवा पदाधिकारी या कार्यक्रमात सहभागी होणार नाही. शिवसेनादेखील या कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचे शहराध्यक्ष विनायक निम्हण यांनी स्पष्ट केले आहे. मनसेच्या वतीनेही कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याची भूमिका मांडण्यात आली आहे. रिपाइंच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात निदर्शने करण्यात येणार असल्याचे गटनेते सिद्धार्थ धेंडे यांनी स्पष्ट केले आहे.