शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा आजही मला फोन येतात; शिंदेंच्या कॅबिनेट मंत्र्याचा मोठा दावा, महायुतीत खळबळ
2
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
3
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
4
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
5
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
6
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
7
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
8
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
9
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
10
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
11
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
12
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
13
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
14
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
15
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
16
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
17
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
18
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
19
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
20
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा

जबाबानंतरही गूढ कायम

By admin | Updated: October 5, 2015 03:31 IST

फुटाळा चौपाटीवर गंभीररीत्या भाजलेली निकिता विष्णूदास फुलवानी (२२) हिचे रविवारी न्यायदंडाधिकाऱ्यासमोर पोलिसांनीजबाब नोंदवून घेतले

नागपूर : फुटाळा चौपाटीवर गंभीररीत्या भाजलेली निकिता विष्णूदास फुलवानी (२२) हिचे रविवारी न्यायदंडाधिकाऱ्यासमोर पोलिसांनीजबाब नोंदवून घेतले. मात्र, तिने नेमके काय सांगितले आणि या प्रकरणामागील पार्श्वभूमी काय त्याचा खुलासा न झाल्यामुळे हे जळीतकांड अधिकच संशयास्पद ठरले आहे. शनिवारी रात्री ९.३० च्या सुमारास फुटाळा चौपाटीवर असलेल्या ‘फुडीजफर्स्ट लव्ह’ रेस्टॉरेंटच्या छतावर निकिता जळाली. तिने स्वत:ला जाळून घेतले की कुणी तिला पेटवून दिले, हे स्पष्ट न झाल्यामुळे रात्रीपासून उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. निकिताची प्रकृती चिंताजनक असून, तिला मेडिकलमधून मध्यरात्री देवनगर चौकातील एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तेथे रविवारी दुपारी अंबाझरी पोलिसांनी विशेष न्यायदंडाधिकाऱ्यासमोर तिचे बयाण नोंदवून घेण्यात आले. यानंतर अतिरिक्त आयुक्त श्रीकांत तरवडे आणि पोलीस दलाच्या प्रवक्त्या डीसीपी दीपाली मासिरकर यांनी रविवारी रात्री पत्रकारांना या घटनेची माहिती देताना व्यक्तिगत कारणामुळे निकिताने स्वत:ला पेटवून घेतल्याची माहिती दिली. रस्त्यातून तिने एका बाटलीत पेट्रोल आणि माचिस विकत घेतली. त्यानंतर ती रेस्टॉरेंटच्या छतावर पोहचली. तेथे तिने स्वत:ला पेटवून घेतले. यावेळी तिच्यासोबत कुणीच नव्हते, असेही निकिताने सांगितल्याचे डीसीपी मासिरकर म्हणाल्या. पत्रकारांनी वारंवार विचारूनही कारण व्यक्तिगत असल्याने ते सांगता येणार नाही, असे मासिरकर म्हणाल्या.