शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

असहिष्णुतेला लेखणीनेच उत्तर द्या

By admin | Updated: May 2, 2016 00:40 IST

असहिष्णुतेचा निषेध म्हणून पुरस्कार परत द्याल; पण त्यातून मिळालेली उभारी, बळ कसे परत करणार?, अशा ‘पुरस्कार वापसी’पेक्षा लेखकांनी त्यांचे शस्त्र असलेल्या लेखणीनेच संबंधितांना

नाशिक : असहिष्णुतेचा निषेध म्हणून पुरस्कार परत द्याल; पण त्यातून मिळालेली उभारी, बळ कसे परत करणार?, अशा ‘पुरस्कार वापसी’पेक्षा लेखकांनी त्यांचे शस्त्र असलेल्या लेखणीनेच संबंधितांना उत्तर द्यावे. लेखकांनी डोळ््यांसमोर मोठी ध्येये ठेवावीत, असा सल्ला ज्येष्ठ अनुवादक व लेखिका उमा कुलकर्णी यांनी दिला.सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित वाङ्मयीन पुरस्कारांच्या वितरणप्रसंगी त्या बोलत होत्या. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमात उमा कुलकर्णी यांच्या हस्ते चंद्रकला कुलकर्णी व एल. के. कुलकर्णी यांना ‘गंगे तुझ्या तीराला’ या ललितेतर ग्रंथासाठी डॉ. वि. म. गोगटे पुरस्काराने, प्रणव सखदेव यांना उमेदीने कथालेखनासाठीच्या डॉ. अ. वा. वर्टी पुरस्काराने, सतीश काळसेकर यांना ‘पायपीट’साठी मु. ब. यंदे पुरस्काराने, डॉ. संजय ढोले यांना ‘संकरित’ या लघुकथासंग्रहासाठी पु. ना. पंडित पुरस्काराने, राकेश वानखेडे यांना ‘पुरोगामी’ कादंबरीसाठी धनंजय कुलकर्णी पुरस्काराने गौरवण्यात आले. पाच हजार रुपये, स्मृतिचन्ह असे पुरस्कारांचे स्वरूप आहे.सन्मानाला उत्तर देताना एल. के. कुलकर्णी यांनी सांगितले की, गंगेवर ग्रंथ लिहिताना ती कल्पनेपेक्षा कितीतरी पटीने महान असल्याचे जाणवले; मात्र प्रदूषणामुळे मन विषण्ण झाले. देशातील नद्यांच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाल्याचे ते म्हणाले. प्रणव सखदेव म्हणाले, कथेकडे पूर्वी कादंबरीचा सराव, विरंगुळ््याचे साधन या दृष्टीने पाहिले जात होते. आता मात्र अनेक तरुण लेखक या प्रकाराकडे वळत असल्याने दिलासा वाटतो. भारतीय पुराणकथांचा आधुनिक काळाशी संकर करायला हवा, असेही ते म्हणाले.सतीश काळसेकर यांनी आयुष्यात वाचन, संगीत व प्रचंड भटकंती केल्याचे सांगितले. त्यातील अंशत: भागच आपल्या पुस्तकात आला असून, या पुस्तकाचे श्रेय मित्राला आहे, असे त्यांनी सांगितले. डॉ. संजय ढोले म्हणाले, लोकांपर्यंत विज्ञान पोहोचवण्यासाठी लेखन करीत आहे. सध्या विज्ञान नसलेल्या कथा लिहिल्या जात असल्याने वाचकांत संभ्रम निर्माण होत असल्याबद्दलही त्यांनी खंत व्यक्त केली. (प्रतिनिधी)‘पुरोगामी’ कादंबरीने आपल्याला लेखक म्हणून मान्यता मिळवून दिली. ६० वर्षांत पुरोगामित्व कोठून कोठे येऊन ठेपल्याची मीमांसा करणारी कादंबरी आहे.- राकेश वानखेडे