शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईचा आणखी एक बळी

By admin | Updated: June 27, 2016 05:05 IST

मुंब्रा स्थानकातून पाणी घेऊन येणाऱ्या सीताराणी गंगाप्रसाद पटवा (४५) या महिलेचा रेल्वेची धडक लागून मृत्यू झाला.

डोंबिवली : दिव्यात भीषण पाणीटंचाई असल्याने मुंब्रा स्थानकातून पाणी घेऊन येणाऱ्या सीताराणी गंगाप्रसाद पटवा (४५) या महिलेचा रेल्वेची धडक लागून मृत्यू झाला. दिव्यातील पाणीटंचाईने दोन व्यक्तींचे असेच बळी गेले आहेत.ठाणे महापालिकेच्या हद्दीतील दिव्यात भीषण पाणीटंचाई भेडसावत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. पर्याय नसल्याने मुंब्रा स्थानकातून पाणी आणावे लागते. पाणी आणताना रूळ ओलांडताना जीव धोक्यात घालावा लागतो. रविवारी सकाळी अप धीम्या मार्गावर सीताराणी पटवा यांना अपघात झाला. रेल्वे पोलिसांनी सांगितले की, कपडे धुण्यासाठी गेलेल्या सीताराणी पश्चिमेतून पूर्वेला जात होत्या. त्यादरम्यान अप धीम्या मार्गावरून आलेल्या लोकलचा त्यांना अंदाज आला नाही आणि गाडीची धडक लागून त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पती गंगाप्र्रसाद, विनोद, गोविंद, लक्ष्मीनारायण ही तीन मुले, रीना ही मुलगी, गुडिया (सून) असा परिवार आहे. दिव्यात पश्चिमेला रेल्वे रुळांनजीकच्या समांतर रस्त्यालगत असलेल्या साईकुटीर इमारतीत पटवा कुटुंब २००९ पासून वास्तव्याला आहे.सहा महिन्यांपूर्वी रात्रीच्या वेळी दिव्यातून मुंब्रा स्थानकात पाणी भरण्याच्या निमित्ताने गेलेल्या एका नागरिकाचा लोकलची धडक लागून मृत्यू झाला होता. केवळ पाणीटंचाईमुळे पाण्याच्या शोधात अन्यत्र जाणाऱ्या नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. असे असतानाही ठाणे महापालिका प्रशासन नागरिकांची अडचण सोडवण्यासाठी कोणतीही प्रभावी उपाययोजना करीत नाही. केवळ अश्वासने देते. येथील नगरसेवक निष्क्रिय असून दिवावासीयांची स्थिती अतिशय गंभीर होत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त झाली. ठाणे रेल्वे पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. (प्रतिनिधी)