शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
2
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
3
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
4
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
5
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
6
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
7
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
8
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
9
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
12
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
13
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
14
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
15
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
16
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
20
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."

भुजबळांना आणखी एक धक्का, सीएला अटक

By admin | Updated: May 5, 2016 12:27 IST

सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) छगन भुजबळांचे चार्टर्ड अकाऊंटंट सुनील नाईक यांना अटक केली आहे. सुनील नाईक यांच्या निवासस्थानावरुन त्यांना अटक करण्यात आली आहे

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 05 - महाराष्ट्र सदन बांधकाम गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळ यांना आणखी एक धक्का बसला आहे. सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) छगन भुजबळांचे चार्टर्ड अकाऊंटंट सुनील नाईक यांना अटक केली आहे. सुनील नाईक यांच्या निवासस्थानावरुन त्यांना अटक करण्यात आली आहे. 
 
न्यायालयाने सुनील नाईक यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलेला होता. त्यानंतर ईडीने  ही अटकेची कारवाई केली आहे. नाईक यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.  सुनील नाईक हे भुजबळांच्या वांद्रे येथील मुंबई एज्युकेशन ट्रस्टचे सीए होते. समीर आणि छगन भुजबळ यांच्या पैशांच्या अफरातफरी आणि महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी सुनील नाईक यांच्याकडून महत्वाची माहिती मिळू शकते. 
 
गेल्या आठवड्यात विशेष न्यायाधीश पी. आर. भावके यांनी पंकज भुजबळ यांच्यासह 28 जणांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याचे आदेश दिले होते. कोर्टाने त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश ईडीला दिले होते.
 
भुजबळांना अटक
 
महाराष्ट्र सदन आणि इतर ११ प्रकरणी घोटाळा केल्याच्या आरोपाखाली लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने भुजबळांवर आरोपपत्र दाखल करून चौकशीसाठी समन्स बजावले होते. एकूण ८७० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाच्या अधिका-यांनी भुजबळांची चौकशी करण्याची मागणी केली होती. १४ मार्चला ११ तासांच्या मॅरेथॉन चौकशीनंतर सक्तवसुली संचालनालय (ईडी)कडून भुजबळांना अटक करण्यात आली होती.