शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

आणखी एका पोलिसावर हल्ला

By admin | Updated: October 23, 2016 01:42 IST

क्रॉफर्ड मार्केट परिसरात अनधिकृतपणे पार्क केलेल्या गाड्यांवर कारवाईसाठी गेलेल्या पोलीस शिपाई युवराज पाटील (३९) यांना एका कारचालकाने दमदाटी करत मारहाण केल्याची

मुंबई : क्रॉफर्ड मार्केट परिसरात अनधिकृतपणे पार्क केलेल्या गाड्यांवर कारवाईसाठी गेलेल्या पोलीस शिपाई युवराज पाटील (३९) यांना एका कारचालकाने दमदाटी करत मारहाण केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. मात्र गुन्हा दाखल करु नये म्हणून सपाच्या आमदाराकडून दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. दबावाला न जुमानता एम.आर.ए. मार्ग पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. एम.आर.ए.मार्ग पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस शिपाई पाटील हे सहकाऱ्यांसोबत क्रॉफर्ड मार्केट परिसरातील अनधिकृतरित्या पार्क केलेल्या गाड्यांवर कारवाई करण्यासाठी गेले होते. रात्री सव्वा आठच्या सुमारास कार चालक निशाद शेख (२६) याने पाटील यांच्याशी हुज्जत घालत त्यांना मारहाण केली. पाटील यांनी अन्य सहकाऱ्यांच्या मदतीने शेख याला पकडून पोलीस ठाण्यात आणले. हॉटेल चालक असलेल्या शेख याच्या बचावासाठी आणि याप्रकरणी कारवाई न करण्यासाठी एका सपा आमदाराकडून दबाव येत होता. या दबावाला न जुमानता पोलिसांनी गुन्हा दाखल करून शेख याला गजाआड केले.त्यापूर्वी दारुच्या नशेत सांताक्रुझमधील रस्त्यावर धिंगाणा घालणाऱ्या पांडुरंग बारकू दाखरे (३४) याने विले पार्ले पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार अशोक सोनावणे (५३) यांना शिविगाळ करत मारहाण केली. सोनावणे यांनी त्याला रुग्णालयात नेले, तसेच पोलीस ठाण्यात आणले असता तेथेही दाखरे याने धिंगाणा घालून तोडफोड केली. गुरूवारी रात्री दोन वाजल्यापासून पहाटे पाच वाजेपर्यत हा धिंगाणा सुरू होता. अखेर गुन्हा दाखल करून दाखरे याला पोलिसांनी अटक केली आहे. (प्रतिनिधी) धडकेत पोलीस जखमी गुरुवारी रात्री आठच्या सुमारास गोरेगाव पश्चिमेकडील सिद्धार्थ रुग्णालयासमोर गोरेगाव पोलिसांची नाकाबंदी सुरु होती. यावेळी गोरेगाव पोलीस ठाण्याचे समीर भोगवेकर त्यांच्या सहकाऱ्यांसोबत वाहतूकीचे नियोजन करत होते. याच दरम्यान भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीस्वाराला त्यांनी अडविले. याच वेळी सुसाट सुटलेला दुचाकीस्वाराचा गाडीवरचा ताबा सुटला आणि तो भोगवेकर यांना धडक देत खाली कोसळला. या अपघातात भोगवेकरही जखमी झाले.