शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

अकरावी आॅनलाईन प्रवेशाची विद्यार्थ्यांना २० जुलैनंतर आणखी एक संधी ?

By admin | Updated: July 14, 2016 20:28 IST

अकरावी आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेत चूकीचे अर्ज भरलेले, किंवा अर्ज भरून यादीत नाव आल्यानंतर प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांना २० जुलैनंतर प्रवेशाची आणखी एक संधी मिळण्याची शक्यता

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. १४ - अकरावी आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेत चूकीचे अर्ज भरलेले, किंवा अर्ज भरून यादीत नाव आल्यानंतर प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांना २० जुलैनंतर प्रवेशाची आणखी एक संधी मिळण्याची शक्यता आहे. आॅनलाईन प्रक्रियेत सामील न झालेल्या किंवा सामील झाल्यानंतर चुकीमुळे बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची आणखी एक संधी देण्याचा विचार सुरू असल्याचे उपसंचालक कार्यालयातील सूत्रांनी सांगितले.उपसंचालक कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बहुतांश विद्यार्थ्यांनी चूूकीचा अर्ज भरल्याने किंवा, पसंतीक्रम अर्जात चूकी केल्याने त्यांना आॅनलाईन प्रक्रियेपासून वंचित राहावे लागले.याशिवाय अर्धवट माहितीमुळे काही विद्यार्थ्यांनी पहिल्या किंवा दुसऱ्या यादीत प्रवेश निश्चित झाल्यानंतर संबंधित महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेतलेले नाहीत. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना मुंबई महानगर क्षेत्रातील उरलेल्या रिक्त जागांवर प्रवेश देण्याचा विचार सुरू आहे. त्यासाठी उपसंचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांची एक बैठकही पार पडली.अकरावीची तिसरी यादी मंगळवारी जाहीर झाली असून अद्याप १ हजार २२८ विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतिक्षेत आहेत. त्यांच्यासाठी १८ जुलैला अकरावीची चौथी यादी जाहीर होणार आहे. त्यामुळे २० जुलैपर्यंत चौथ्या यादीतील विद्यार्थी महाविद्यालयांत प्रवेश घेतील. त्यानंतरच अर्ज न भरलेले, चुकीचा अर्ज भरलेले, अर्ज भरून यादीत नाव आल्यानंतर महाविद्यालयात प्रवेश न घेतलेले विद्यार्थी यांच्यासाठी आॅनलाईन प्रवेश नोंदणी सुरू होण्याची शक्यता आहे.