शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आणखी एका लष्करी जवानाच्या पत्नीची आत्महत्या

By admin | Updated: June 23, 2017 18:51 IST

औंध लष्करी वसाहतीत राहणा-या आणखी एका जवानाच्या पत्नीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आ

ऑनलाइन लोकमत
पिंपरी-चिंचवड, दि. 23 -  सांगवी येथे चार दिवसांपूर्वी लष्करी जवानाच्या पत्नीने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच औंध लष्करी वसाहतीत राहणा-या आणखी एका जवानाच्या पत्नीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. 
 
स्वाती अमोल जगदाळे (वय.२७ ) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वाती यांनी 19 जून रोजी राहत्या घरी गळफास घेतला होता. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र गुरुवारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
 
दरम्यान, चार दिवसांपूर्वीच सांगवी येथेही लष्करी जवानाची पत्नी ज्योती माहागावकर यांनी गळफास घेवून आत्महत्या केली होती. एकाच आठवड्यात  शहरात घडलेल्या या दोन घटनांमुळे खळबळ उडाली आहे.
 
सांगवी येथे लष्करी जवानाच्या पत्नीची आत्महत्या
लष्करात औंध हेडक्वॉर्टरमध्ये नोकरीस असलेल्या जवानाच्या पत्नीने सांगवी येथे राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (20 जून) दुपारी दोनच्या सुमारास उघडकीस आली. ज्योती प्रकाश महागावकर (वय 22) असे विवाहितेचे नाव आहे. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेचे पती लष्कराच्या औंध हेडक्वार्टर येथे  कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत. ते सकाळी कामावर गेले होते. दुपारी अडीचच्या सुमारास घरी आले असता, घराचा दरवाजा ठोठावला.
 
परंतु दरवाजा उघडला नाही त्यामुळे त्यांना संशय आला. त्यांनी दरवाजा तोडला असता घरात पत्नी पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. महागावकर दाम्पत्य मूळचे कोल्हापुरचे असून ते सांगवी येथे ते खोली भाड्याने घेऊन राहत होते.