शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात आणखी एक शासकीय रुग्णालय

By admin | Updated: June 29, 2016 00:58 IST

बिबवेवाडी येथे ससून शासकीय रुग्णालयाच्या धर्तीवर आणखी एक शासकीय रुग्णालय होण्याची शक्यता आहे.

पुणे : बिबवेवाडी येथे ससून शासकीय रुग्णालयाच्या धर्तीवर आणखी एक शासकीय रुग्णालय होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी असणाऱ्या राज्य कामगार विमा रुग्णालयाच्या (ईएसआय) जागी हे रुग्णालय उभारण्यास कामगारमंत्री प्रकाश मेहता यांनी मान्यता दिली आहे. त्यासंदर्भात मुंबईत लवकरच बैठक घेऊन निर्णय करणार असल्याचे मेहता यांनी सांगितले. ईएसआयसीतर्फे रुग्णालयाची उभारणी करून ते रुग्णालय महापालिका चालवेल किंवा ते राज्य शासनाकडे सुपूर्द करेल, असे धोरण शासनाने ठरविले असल्याची माहिती मेहता यांनी सोमवारी दिली. या रुग्णालयाचा लाभ कामगारांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांनाही होणार आहे. मेहता यांनी सोमवारी विमा रुग्णालयाला भेट दिली. या वेळी कामगार विमा निगमचे संचालक दीपक जोशी, वैद्यकीय प्रशासन अधिकारी डॉ. श्रीपाद भागवत, वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. बी. सरोदे, वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही. ए. इंगळे, डॉ. एस. एस. सताळे, मोहननगर येथील प्रशासकीय अधिकारी डॉ. एम. आर. पाठक, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही. पी. भगत, विभागीय अधिकारी एस. एम. झोंडे, नगरसेविका मानसी देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.>नागरिकांना मिळतील चांगल्या सुविधाआमदार माधुरी मिसाळ म्हणाल्या, की सुमारे १६.५ एकर जागेवर कामगार विमा रुग्णालय उभारण्यात आले आहे. या ठिकाणी बाह्यरुग्ण विभागात कोणत्याही सुविधा नसून तो कार्यान्वित नाही. स्वतंत्र विशेषज्ञांसह आंतररुग्ण विभाग (आयपीडी) व अन्य सोयीसुविधांचा अभाव आहे. त्यामुळे या ठिकाणी ससूनच्या धर्तीवर मोठे रुग्णालय उभारण्यासाठी मी सहा वर्षांपासून पाठपुरावा करीत आहे. कामगारमंत्र्यांनी या मागणीला तत्त्वत: मान्यता दिल्याने नागरिकांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळू शकतील. त्यामुळे ससून शासकीय रुग्णालयावरचा ताणही कमी होईल.