शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

आणखी एका शेतकऱ्याची आत्महत्या

By admin | Updated: April 21, 2016 03:20 IST

सततची नापिकी व कर्जाला कंटाळून आणखी एका शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळले. चाकूर तालुक्यातील हिप्पळनेर येथील विठ्ठल संतराम गुंड्डावार (४५) या शेतकऱ्याने बुधवारी दुपारी

चापोली (जि. लातूर)/ आलेगाव (जि. परभणी) : सततची नापिकी व कर्जाला कंटाळून आणखी एका शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळले. चाकूर तालुक्यातील हिप्पळनेर येथील विठ्ठल संतराम गुंड्डावार (४५) या शेतकऱ्याने बुधवारी दुपारी स्वत:च्या शेतातील बाभळीच्या झाडास गळाफास घेऊन आत्महत्या केली़ गुंड्डावार यांना एक एकर कोरडवाहू शेती आहे़ दोन वर्षांत शेतीतून उत्पन्न निघाले नाही़ खाजगी सावकारी कर्ज काढून गेल्यावर्षी एका मुलीचा विवाह केला़ नापिकीमुळे ते चिंतेत होते. > ४दुसरी घटना परभणी जिल्ह्यात घडली. पूर्णा तालुक्यातील आलेगाव सवराते येथील कर्जबाजारी शेतकऱ्याची पत्नी कमलबाई त्र्यंबक घाटोळ (३६ ) यांनी विष प्राशन केल्याची घटना १२ एप्रिल रोजी घडली होती. उपचारादरम्यान हिचा १३ एप्रिल रोजी मृत्यू झाला. ४आलेगाव सवराते येथील त्र्यंबक घाटोळ यांच्या नावे असलेल्या शेतीवर युनियन बँक आॅफ इंडिया, महाराष्ट्र ग्रामीण बँक कावलगाव व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आलेगाव या बँकेचे कर्ज आहे. मागील वर्षी मुलीचे लग्न झाल्याने त्यांच्या कुटुंबियांना खाजगी देणे झाले होते. त्यांच्या पश्चात पती, सासू, सासरे, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातू असा परिवार आहे. > ४केज (जि. बीड) : तालुक्यातील पळसखेड येथे रामचंद्र गुलाब अडागळे (४०) या मजुराने मुलींच्या लग्नाच्या चिंतेतून मंगळवारी रात्री आपली जीवनयात्रा संपवली. त्यांना चार मुली व एक मुलगा आहे. ते भूमिहिन आहेत. ते पत्नीसह मोलमजुरी करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत. मात्र, दुष्काळामुळे कामधंदाही मिळत नव्हता. त्यामुळे ते बेचैन होते. त्यांच्या दोन मुली उपवर झाल्या होत्या. त्यामुळे रामचंद्र यांना त्यांच्या लग्नाची चिंता होती. मंगळवारी घरातील सर्व मंडळी नातेवाईकाच्या लग्नकार्यासाठी बाहेरगावी गेली असताना त्यांनी घराच्या आडूला दोरीने गळफास घेतला