शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

आणखी एका शेतकऱ्याची आत्महत्या

By admin | Updated: May 5, 2017 02:24 IST

सलग दुसऱ्या दिवशी शेतकरी आत्महत्येने बारामती तालुका हादरला आहे. शिर्सुफळ येथील काशिनाथ हिवरकर यांच्या आत्महत्येनंतर

बारामती / सुपे : सलग दुसऱ्या दिवशी शेतकरी आत्महत्येने बारामती तालुका हादरला आहे. शिर्सुफळ येथील काशिनाथ हिवरकर यांच्या आत्महत्येनंतर बुधवारी (दि. ३) मध्यरात्री खोपवाडी (ता. बारामती) येथील सुखदेव चंद्रकांत चांदगुडे (वय ३५, रा. खोपवाडी) या तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.त्याच्या मागे आई-वडील, भाऊ, पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुखदेव यांचा शेतीव्यवसाय तसेच ट्रकचा व्यवसाय होता. बुधवारी (दि. ३) दुपारी चांदगुडे यांनी पत्नीला यात्रेच्यानिमित्ताने माहेरी सोडले होते. त्यामुळे घरी कोणी नसल्याचे पाहून घरातील पत्र्याच्या अँगलला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. यासंदर्भातील खबर नामदेव दादासोा चांदगुडे यांनी पोलिसांना दिली.गुरुवारी सकाळी शेजारील नामदेव चांदगुडे यांनी घराच्या खिडकीतून पाहिल्यावर झालेला प्रकार समोर आला. चांदगुडे यांनी पोलिसांना त्वरित खबर दिली. सुखदेव चांदगुडे यांच्या वडिलांच्या नावावर शेतीचे पीककर्ज होते. तसेच ट्रकचाही कर्जाचा बोजा झाला होता. या कर्जाच्या नैराश्यातून सुखदेवने आत्महत्या केली असावी, असा अंदाज नातलगांनी व्यक्त केला आहे. येथील फौजदार के. बी. मोरे अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व तहसीलदार हनुमंत पाटील यांनी घटनास्थळी येऊन भेट दिली. ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी वेळेवर उपस्थित नसल्याचे पवार यांच्या निदर्शनास आले. यानंतर त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनादेखील या प्रकाराची माहिती देऊन, योग्य त्या सूचना दिल्या. ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनीशवविच्छेदन केले. बारामतीत शेतकरी आत्महत्येचे सत्र...?बारामती तालुक्याच्या जिरायती भागातील शेतकरी नेहमीच्या दुष्काळाने अडचणीत आला आहे. शेतीच्या पाण्यासाठी अनेक वेळा येथील जनता रस्त्यावर उतारली आहे. मात्र शासनदरबारी त्यांची केवळ उपेक्षाच झाली आहे. सततच्या नापीकी आणि दुष्काळामुळे येथील शेतकऱ्यांचा धीर खचू लागला आहे. त्यामुळे बारामती तालुक्यातदेखील शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरू झाले नाही ना, अशी भीतीही व्यक्त होऊ लागली आहे.