शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

आजाराला कंटाळून आणखी एका डॉक्टरची आत्महत्या

By admin | Updated: April 22, 2017 12:02 IST

धुळ्यातील शिंदखेडा येथील एका डॉक्टरनं आजार पणाच्या नैराश्यातून स्वतःचं जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे.

ऑनलाइन लोकमत
धुळे, दि. 22 - शिंदखेडा येथील एका डॉक्टरांनी राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. श्याम उद्धव गिरासे (42) असे आत्महत्या करणा-या डॉक्टरचे नाव असून ते राजपूत गल्लीत राहत होते. 
 
शनिवारी सकाळी त्यांनी राहत्या घरात आत्महत्या केली. दोन दिवसांपूर्वीच गिरासे यांना कॅन्सर झाल्येच निदान समोर आले होते. याच नैराश्यातून त्यांनी स्वतःची जीवनयात्रा संपवली असल्याचे बोलले जात आहे. 
(आजाराला कंटाळून डॉक्टरची आत्महत्या) 
दरम्यान, काही दिवसांपूर्वी पोटासंबंधीच्या आजाराने त्रस्त असलेल्या भंडारा शहरातील एका प्रख्यात चर्मविकार तज्ज्ञाने आत्महत्या केली होती. विद्यानगर कॉलनीत  घडलेली ही घटना 18 एप्रिल रोजी उघड झाली होती. यामुळे जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
 
प्रितीश अरविंद भोयर (३०) असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव. सोमवारला रात्री भोजन केल्यानंतर त्यांनी राहत्या घरी विष मिश्रित केलेले सलाईन स्वत:ला टोचून घेतले.  मंगळवारी सकाळी प्रितीशचे वडील अरविंद भोयर यांनी त्यांना उठविण्यासाठी आवाज दिला. मात्र आतून कोणताही प्रतिसाद आला नाही. त्यामुळे त्यांनी खोलीत जाऊन पाहिले असता डॉ.प्रितीश हे निपचित पडून असल्याचे त्यांना आढळून आले. याप्रकरणी वडिलांनी भंडारा पोलिसांना माहिती दिली. 
 
पोलिसांना त्यांच्या खोलीतून सलाईनची रिकामी बॉटल, काही वस्तू व आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी आढळून आली. रात्रीला सलाईनमधून विष घेवून डॉ.प्रितीश यांनी आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.  डॉ.प्रितीश यांना पोटाच्या आजारामुळे होणाऱ्या वेदना त्यांना असह्य झाल्यानं त्यांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज वडिलांनी पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीत केला आहे. एमबीबीएस, एमडी असे उच्च विद्याविभुषित असलेले डॉ.प्रितीश हे शहरात चर्मविकार तज्ज्ञ म्हणून प्रख्यात होते.