शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आणखी एका नगरसेविकेचे पद धोक्यात

By admin | Updated: July 11, 2017 00:58 IST

भारतीय जनता पक्षाच्या किरण जठार यांच्या नगरसेविका पदानंतर आता त्यांच्याच आणखी एका नगरसेविकेचे पद धोक्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : भारतीय जनता पक्षाच्या किरण जठार यांच्या नगरसेविका पदानंतर आता त्यांच्याच आणखी एका नगरसेविकेचे पद धोक्यात आले आहे. प्रभाग क्रमांक २ मधील भाजपाच्या नगरसेविका फरजाना आयुब शेख यांचे जात प्रमाणपत्र विभागीय जात पडताळणी समितीने सोमवारी अवैध ठरविले. यापूर्वी जठार यांचे प्रमाणपत्र अवैध ठरवून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक किशोर धनकवडे यांचे पद याच कारणाने रद्द करण्याची कारवाई महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी केली आहे.दरम्यान, जठार यांच्यावर कारवाई न करता, आयुक्तांनी राष्ट्रवादीच्या धनकवडे यांच्यावर मात्र कारवाई केली. आता भाजपाच्या दुसऱ्या नगरसेविका अडचणीत आल्या आहेत. त्यामुळे त्यांचे पद रद्द करण्याची कारवाई होते की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्त राजकीय दबावाखाली निर्णय घेतात, अशी टीका आधीच केली आहे.इतर मागासवर्ग महिलेसाठी आरक्षित असलेल्या जागेवरून शेख विजयी झाल्या होत्या. त्यांच्या जात प्रमाणपत्रावर त्यांच्या भगवान जाधव व अर्चना कुचेकर यांनी आक्षेप घेतला होता. त्यावर सदानंद पाटील, व्ही. आर. गायकवाड, व्ही. ए. पाटील यांच्या समितीपुढे सुनावणी झाली. त्यानंतर जात स्पष्ट होत नाही, या कारणावरून समितीने त्यांचे प्रमाणपत्र रद्द ठरवले.