शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मुंब्य्रातील आणखी एक पकडला

By admin | Updated: January 31, 2016 03:25 IST

इसिसचा भारतातील म्होरक्या मुदब्बीर शेख याच्या मुंब्रा येथून मुसक्या आवळल्यानंतर मुंब्य्रातील आणखी एकाचे इसिसशी कनेक्शन असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

- जितेंद्र कालेकर,  ठाणेइसिसचा भारतातील म्होरक्या मुदब्बीर शेख याच्या मुंब्रा येथून मुसक्या आवळल्यानंतर मुंब्य्रातील आणखी एकाचे इसिसशी कनेक्शन असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. दहशतवादी कारवायांच्या संशयावरून सौदी अरेबियाने हाकलून लावलेल्या तिघांना राष्ट्रीय तपास संस्थेने दिल्ली विमानतळावर ताब्यात घेतले असून, त्यात मुंब्रा येथील मोहम्मद फरहान मोहम्मद रफीक शेख याचा समावेश आहे.इंटरनेटद्वारे इसिसच्या अतिरेकी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या संशयावरून मोहम्मद फरहान याच्यासह जम्मू-काश्मीर येथील शेख अजहर अल इस्लाम अब्दुल सत्तार आणि हैदराबादचा अदमान हुसेन मोहम्मद हुसेन ऊर्फ अदनान दमुदी या इसिसच्या कथित संशयित अतिरेक्यांना दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण देणे, देशविघातक कृत्य करण्याच्या आरोपांखाली शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. तिघांना कोठडीत ठेवण्याचे आदेश एनआयएच्या न्यायालयाने दिले आहेत.इसिसचा भारतातील म्होरक्या मुदब्बीर शेखला पकडल्यानंतर मोहम्मद फरहान शेख हा मुंब्रा येथील दुसरा संशयित अतिरेकी ठरला आहे. मोहम्मद फरहानच्या आईचे लहानपणीच निधन झाले. वडिलांनी दुसरे लग्न केल्यामुळे आजीनेच त्याचा सांभाळ केला. आपला नातू ‘इसिस’च्या मार्गावर गेल्याची माहिती तिला एनआयएकडून समजल्यानंतर धक्काच बसला. घरी आलेल्या अधिकाऱ्यांनी माहिती दिल्यानंतर तिला रडूच कोसळले. मुंब्य्रातील एका साध्या घरात ही वयोवृद्ध महिला वास्तव्यास आहे. मुंबईतील विद्याविहार येथील सोमय्या महाविद्यालयात बी.कॉम.चे शिक्षण घेतल्यानंतर फरहान चांगल्या नोकरीसाठी तीन वर्षांपूर्वीच परदेशी (सौदी अरेबिया) गेला होता. सौदीमध्ये एका खासगी कंपनीत नोकरीला लागल्यानंतर त्याला लॅपटॉपही मिळाला होता. मात्र, लॅपटॉपवरूनच तो फेसबुकच्या माध्यमातून इसिससाठी काम करीत असल्याचे सौदी सरकारच्या निदर्शनास आले.