शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

आणखी २ माजी सैनिकांचा शोध

By admin | Updated: May 18, 2017 00:09 IST

सैन्य भरती घोटाळ्यातील आरोपी, सैन्याचा कर्मचारी धाकलू पाटील याच्यासह आणखी दोन माजी सैनिक आणि सैन्य भरतीचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांच्या तीन संचालकांचा

- लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : सैन्य भरती घोटाळ्यातील आरोपी, सैन्याचा कर्मचारी धाकलू पाटील याच्यासह आणखी दोन माजी सैनिक आणि सैन्य भरतीचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांच्या तीन संचालकांचा ठाणे पोलिसांकडून शोध सुरू आहे. सैन्य भरतीची प्रश्नपत्रिका फोडण्यात या आरोपींचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे.सैन्य भरतीची प्रश्नपत्रिका फोडणाऱ्या टोळीचा ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने फेब्रुवारी महिन्यात पर्दाफाश केला होता. नागपूर येथील सैन्य भरती कार्यालयातील लिपिक वर्गीय कर्मचारी रवींद्रकुमार जांगू, धरमवीर सिंग आणि निगमकुमार पांडे हे या प्रकरणातील प्रमुख आरोपी असून, तपासादरम्यान नागालॅण्ड येथे कार्यरत आसाम रायफल रेजिमेंटचा जवान धाकलू पाटील याचाही या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते. चौकशीसाठी धाकलू पाटीलला ताब्यात घेण्यास ‘आसाम रायफल’ने संमती दिल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. त्याच्या गावीही पोलिसांचे पथक जाऊन आले. त्याची रीतसर रजा केवळ १५ एप्रिलपर्यंतच होती. तेव्हापासून तो घरी किंवा नोकरीवरही नसल्याची माहिती गुन्हे अन्वेषण शाखेच्या घटक क्रमांक-१चे पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांनी दिली. ‘आसाम रायफल’च्या नोकरीव्यतिरिक्त तो बेळगाव येथे सैन्य भरतीचे प्रशिक्षण देणारी जय भवानी नावाची संस्थाही चालवत असल्याचे त्यांनी सांगितले.या प्रकरणाचा तपास जवळपास अंतिम टप्प्यात असून, काही आजी-माजी सैनिक आणि सैन्य भरतीचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांच्या काही संचालकांसह २४ आरोपींना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली आहे. तपासादरम्यान आणखी दोन माजी सैनिकांचा या गुन्ह्यातील सहभाग स्पष्ट झाला असून, पोलीस यंत्रणा त्यांचाही शोध घेत आहे. फरार घोषित करण्याची प्रक्रियाधाकलू पाटीलच्या अटकेसाठी सर्व प्रयत्न केले; परंतु तो घरी किंवा नोकरीच्या ठिकाणीही हजर नसल्याने त्याला फरार घोषित करण्याची विनंती न्यायालयास करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. धाकलू पाटील हा मुख्य आरोपींपैकी एक असल्याने त्याचा जबाब महत्त्वाचा आहे. त्याचे आणखी किती साथीदार आहेत, सैन्याची प्रश्नपत्रिका फोडण्याचे उद्योग यापूर्वी आणखी किती वेळा झालेत, या प्रश्नांची उत्तरे त्याच्याकडूनच मिळू शकतील, असे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे.